बेळगाव live मुळे मला प्रेरणा मिळाली: ब्रिगेडियर गोविंद कलवड

0
 belgaum

सोशल मीडियाचा आजकाल जितका गैरवापर होतो तितकाच चांगला वापरही होतो. आजच्या पिढीला गैरवापरापासून थांबवण्यासाठी सोशल मीडिया महत्वाचा आहे.
बेळगाव live मुळे आपल्याला प्रेरणा मिळाली आणि बेळगाव live मुळेच बेळगावमध्ये काम करण्याची प्रेरणा मिळाली. अरगन तलाव सुशोभीकरण मी बेळगाव live मुळे करू शकलो. असे मत मराठा लाईट इंफंट्री चे ब्रिगेडियर गोविंद कालवड यांनी व्यक्त केले.

Bregediar speech
पहिल्याच वर्षी आयोजन केलेल्या सेल्फी विथ बाप्पा यात एक हजार हुन अधिक जणांनी सहभाग नोंदवला होता. तीन वर्षांच्या चिमुरड्या पासून सीनियर सीटीझन, महिला, वकील, डॉक्टर, विद्यार्थी ,गृहिणी युवक युवतींनी यात सहभाग नोंदवला. सामाजिक कार्यात अग्रेसर शहरातील गणेश मंडळांचा देखील गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मराठा लाईट इंफंट्रीचे ब्रिगेडियर गोविंद कलवाड, सिटिझन कौन्सिल चे अध्यक्ष सतीश तेंडुलकर, मध्यवर्ती गणेश महामंडळ पी आर ओ विकास कलघटगी,नरगुंदकर भावे चौक गणेश मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब काकतकर हे उपस्थित होते.
बुधवारी सायंकाळी शहरातील नरगुंदकर भावे चौक गणेश मंडळाच्या मंडपात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गणेश भक्तांनी बेळगाव live च्या वाचकांनी कार्यक्रमात सहभागी होऊन शोभा वाढवली होती.
आपला दिवस हा बेळगाव live च्या बातम्यांनी सुरू होतो. मला बेळगाव live मुळे अनेक बातम्या समजतात आणि त्यामुळेच मी योग्य काम करू शकलो असें त्यांनी यावेळी बोलून दाखवले.

bg

श्रेया जांगळे कोतवाल गल्ली,राजू चौगुले ओल्ड गांधी नगर,नागराज दिंनीमनी सपार गल्ली वडगाव,डॉ प्रशांत सायनेकर वडगांव, डॉ सुप्रिया पवार भाग्यनगर,अजिंक्य कदम कोतवाल गल्ली,संध्या ओऊळकर कोतवाल गल्ली,रविना पाटील भाग्यनगर,नंदिनी चौगुले बेळगाव,नेहा गडकरी कणबर्गी, मिथिला अनगोळकर गोंधळी गल्ली,युवराज लोहार उचगावं,मारुती मांडेकर, हिंडलगा,मंजुनाथ कणेरी समर्थनगर,ज्योती वाघवडेकर पाटीलमळा, आणि युवराज चव्हाण पाटील वडगांव हे भाग्यवान सेल्फी विथ बाप्पा स्पर्धेचे विजेते ठरले .हजारहून अधिक सेल्फी live कडे आल्या होत्या त्यात या सेल्फीची लकी निवड करून त्यांना बक्षीस देण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एकनाथ पाटील यांनी तर संदीप खननुकर यांनी आभार मानले.

bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.