‘वर्षभर विधायक कामात समरस असणारे मंडळ’: सोनार गल्ली वडगांव

0
 belgaum

मागील २५ वर्षे या मंडळाचे काम विधायक पद्धतीने सुरू आहे. याबद्दल अनेक बक्षिसेही या मंडळाने मिळवली असून नेहमीच जागृती आणि व्यसनमुक्त तरुण पिढी घडवण्याकडे मंडळाचा पुढाकार आहे.
अध्यक्ष अरुण धामणेकर यांच्या नेतृत्वाखाली या मंडळाचे काम सुरू आहे. दरवर्षी रक्तदान शिबिर भरवणे हा उपक्रम हे मंडळ राबवत आले आहे, तर कायम ७० जण रक्तदान करतात. कुणालाही रक्ताची गरज लागली की मदत घेतली जाते . रक्तांसाठी लोक नेहमीच या मंडळाकडे येतात.
याच बरोबरीने फक्त गणेश उत्सवाच्या काळात काम न करता वर्षभर हे मंडळ काम करीत राहते. आरोग्य तपासणी, डेंग्यू लसीकरण, हृदयरोग तपासणी,चिकन गुनिया तपासणी,दन्त चिकित्सा हे उपक्रम राबवले जातात. नागरिकांनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये हा उद्देश बाळगला जातो.आपल्या कार्याच्या जोरावर हे गणेश मंडळ बेळगावातील उत्कृष्ट विधायक गणेश मंडळ ठरलं आहे.

Sonar galli vadgaon
आर्थिक मदत देण्याकडेही मंडळाने पुढाकार घेतला आहे.अनाथाश्रम ववृद्धाश्रमाना अन्नदान केले जातेच तसेच वर्गणीतून आर्थिक मदतही केली जाते. या मंडळाने ठरवलेलं आहे की दरवर्षी कमीत कमी २५ ते ३० हजार ची मदत करायचीच यासाठी वर्गणी जमवून काम केले जाते.
मूर्ती ठेवतो देखावे नाही असेना मंडळाचे कार्यकर्ते सांगतात. मूर्तीचेही अवतार नाही फक्त गणपती पुजला जातो आणि गणपतीचे विसर्जन केले जाते. विधायक कामामुळे हे मंडळ यापूर्वी विविध स्पर्धांमध्ये बक्षिसाचे मानकरी ठरले आहे. महाविजेता, प्रथम व इतर अनेक बक्षिसे त्यांना मिळाली आहेत.
महाप्रसाद आयोजित करण्या बरोबरच सफाई कामगारांना कपडे वाटप, ट्रेकिंग ला जाणे, गड किल्ल्याना भेटी देणे तिथे आदिवासी महिलांना साड्या वाटप आणि मुलांना वह्या पेन वाटप अशी कामे केली आहेत. मागील वर्षी टेहळणी बुरुज व राजहंसगड स्वच्छता उपक्रम राबवण्यात आला आहे.
तरुणांना किल्ले दर्शन घडवणे,किल्ला स्पर्धेत भाग घेणे, शिवजयंती चित्ररथ स्पर्धेत कायम भाग घेणे अशी कामे हे मंडळ करत आले आहे.

bg
bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.