बेळगाव शहरातील गणेशोत्सव मंडळे आपल्या विधायक उपक्रमांनी प्रसिद्ध आहेत. येथील अनसुरकर गल्लीतील गणेशोत्सव मंडळाने यंदा सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला असून यामधून जागृती सुरू आहे.
या मंडळाने आपल्या मंडपावर सामाजिक संदेश लावून जनतेत जागृती सुरू केली आहे. देखावा सादर करून पैसे खर्च करण्यापेक्षा त्यांनी संदेश फलक लावून विधायकता जपण्यास सुरुवात केली आहे.
“स्वच्छता” म्हणजे रोजचा सण, नाहीतर कायमचे आजारपण असा एक संदेश स्वच्छते बद्दल जागृती करत आहे.
“मुलगा मुलगी आहे समान, दोघेही उंचावतील देशाची मान” तसेच “मुलगा मुलगी भेद नको, मुलगी झाली म्हणून खेद नको” असे संदेश जागृती करू लागले आहेत.
गणपती बघण्यासाठी दररोज हजारो नागरिक येत असतात. त्यांना हे संदेश मदतीनेच ठरतील. हे संदेश वाचून रोज पाच जण शहाणे झाले तरी या मंडळाचा उद्देश साध्य होऊ शकणार आहे.