belgaum

‘श्रीराम सेना हिंदुस्थान’ नवी संघटना’

0
2552
Ramsena
 belgaum

श्रीराम सेनेचे अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी रमाकांत कोंडूसकर यांच्या सह शहरातील सर्व सदस्यांचा राजीनामा घेतल्यावर कोंडूस्कर समर्थकांनी नवीन संघटनेची स्थापना केली आहे.रविवारी दुपारी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ‘श्रीराम सेना हिंदुस्थान’ या नवीन संघटनेला जन्म दिला आहे.

श्री रामसेना हिंदुस्थान या संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी रमाकांत कोंडूसकर एकमतांनी निवड करण्यात आली.गोककचे राजू जाधव,सुनील मुरकीभावी,बेळगावचे रवी कोकीटकर, खानापूरचे पंडित ओगले यांच्या रामसेनेचे मुख्य पदाधिकारी उपस्थित होते.जुन्या श्रीराम सेने प्रमाणेच त्याला हिंदुस्थान हे नाव देऊन श्रीराम सेना हिंदुस्थान अश्या नावांनी नवीन संघटना उभी केली आहे.आज फक्त राष्ट्रीय अध्यक्ष हे पद जाहीर केलं असून लवकरच नवी कार्यकारिणी जाहीर होणार आहे.

Ramsena

बेळगावातील हिंदू संघटनेचे कार्य करण्यासाठी रमाकांत यांनी नवीन संघटना उभी करायला सुरुवात केली आहे.बेळगावातील हिंदू संघटनेचे कार्य करण्यासाठी रमाकांत यांनी नवीन संघटना उभी करायला सुरुवात केली आहे.

या संघटनेच्या माध्यमातून हिंदू रक्षणाचे काम होणार आहे. श्रीराम सेनेतून बाहेर काढण्यात आल्यानंतर नाराजी निर्माण होऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.गेल्या कित्येक दिवसा पासून या संघटनेत धुसफूस चालुच होती आता रविवारी नवीन संघटना सुरू करून रमाकांत कोंडूस्कर यांनी कार्य सुरू केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.