Thursday, April 25, 2024

/

‘कझाकस्तानच्या वीस दिवसांच्या ट्रेनिंग मुळे यश’-मलप्रभा जाधव

 belgaum

इंडोनेशिया येथील जकार्ता येथे झालेल्या एशियन गेम्स मध्ये ब्रॉंझ मेडल घेतलेली बेळगावची कन्या मलप्रभा जाधव हिचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने बेळगावात जल्लोषी स्वागत करण्यात आले.

जिल्हा युवजन क्रीडा खात्याचे वतीनं शासकीय विश्राम धमातील सभागृहात पोलीस आयुक्त डी सी राजप्पा, उपायुक्त सीमा लाटकर,एस पी सुधीर रेड्डी,अतिरिक्त जिल्हाधिकारी बी एस बुद्धिहाळ यांनी मलप्रभाचे अभिनंदन करत सत्कार केला.यावेळी मलप्रभाचे प्रशिक्षक जितेंद्र सिंह,त्रिवेणी सिंह,वडील यल्लप्पा जाधव आई शोभा जाधव उपस्थित होते.

पोलीस आयुक्त डी सी राजप्पा यांनी मलप्रभा जाधवने मिळवलेल्या यशानंतर पोलीस खात्याच्या वतीने दहा हजारांचे बक्षीस जाहीर केले.शासनाची मदत नसतेवेळी स्वतःच्या खर्चातून विदेशी ट्रेनिंग प्रशिक्षकांच आणि मलप्रभेच कौतुक यावेळी पोलिस आयुक्त डी सी राजप्पा यांनी केलं.प्रशिक्षकांची मेहनत आणि एशियन गेम्स पूर्वी कझाकस्तान येथे वीस दिवसांच्या घेतलेल्या ट्रेनिंगचा फायदा झाला त्यामुळेच हे मेडल मिळालं असे मत मलप्रभाने व्यक्त केले.

 belgaum

malaprabha

यावेळी बेळगाव जिल्हा हॉकी संघटना, आमदार विवेकराव पाटील,आमदार अनिल बेनके,सकल मराठा समाज यांच्या सह अनेक खेळाडू अधिकारी तुरमुरी गावचे नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.

सुरुवातीला मलप्रभा जाधव हिचे स्वागत चांनम्मा चौकात करून मिरवणूक काढणार असल्याचे क्रीडा खात्याने जाहीर केले होते मात्र ऐन वेळी सर्किट हाऊस मध्ये कार्यक्रम आटोपता घेण्यात आला चनम्मा चौकात रॅली साठी अनेक क्रीडा प्रेमींनी गर्दी केली होती जिल्हा प्रशासनाने कार्यक्रमात बदल केल्याने क्रीडा प्रेमींनी नाराजी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.