Friday, April 26, 2024

/

वाद सगळीकडे भांडवल समितीचे!

 belgaum

सर्वच राजकीय पक्षात कुठल्यातरी कारणाने भांडणे आणि अंतर्गत वाद आहेतच. पण महाराष्ट्र एकीकरण समितीमधील भांडणाचे तेवढे कायम भांडवल केले जाते. समितीत भांडणे आहेत याचे भांडवल करून निवडून आलेल्यांनाही आता आपल्याच पक्षातील संघर्ष संपवता येईना तेंव्हा वर्चस्व सिद्ध करण्यात त्यांचा वेळ वाया जात आहे.

कर्नाटकातील असो किंव्हा महाराष्ट्रातील असो सगळे राजकीय पक्ष नेहमीच महाराष्ट्र एकीकरण समितीतील भांडणाचे भांडवल करत आलेत. महाराष्ट्रातले नेते नेहमीच तुमची भांडणे मिटवून या असे सांगत असतात, पण त्याच पक्षातील नेत्यांची भांडणे पाहिली तर लोका सांगे ब्रम्हज्ञान आपण कोरडे पाषाण असेच म्हणावे लागते आहे.

महाराष्ट्रात शिवसेनेत पदावरून भांडणे झाली आणि मनसे हा पक्ष तयार झाला. राष्ट्रवादी, काँग्रेस या पक्षात भरपूर भांडणे आहेत.या भांडणात काहींना बळीचा बकरा बनवण्यात आले आहे. भाजपमध्ये मुख्यमंत्री पदावरून असंख्य भांडणे आहेत.
कर्नाटकात तर राजकीय पक्षाचे नेते एकमेकांच्या जीवावर उठलेले दिसतात. एकाद्या ला खुर्चीवरून खाली कसे खेचायचे हे शिकायचे असेल तर कर्नाटकातील कुठल्याही पक्षात जाऊन दोन चार महिने राहिले तर सगळे शिकता येते.

 belgaum

आता लोकसभेची निवडणूक जवळ आल्यामुळे सर्वच ठिकाणी आणि केंद्र पातळीवर सुद्धा रस्सीखेच आणि वाद सुरू होत आहेत. याचेच चित्र बेळगाव जिल्ह्यातही आहे. मुद्दा हा आहे की ज्या बेळगाव जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी समितीच्या भांडणाचे निमित्त साधून आपली पोळी भाजून घेतली त्यांचीच भांडणे आता चव्हाट्यावर येत आहेत.

पीएलडी बँकेच्या वादात जारकीहोळी ब्रदर्स मराठी माणसाच्या बाजूने असल्याचे दाखवत आहेत तर हेब्बाळकर अक्का यांचे वागणे मराठीला दावणीला बांधून घेऊन मराठीच्या विरोधात आहे. काँग्रेस मधील ही ठिणगी पेटायला कारणे बरीच आहेत.आमचे समितिनिष्ठ? नेतेसुद्धा त्यांच्या या वादात महत्वाच्या भूमिकेत आहेत पण या वादात पूर्वीप्रमाणेच मराठी माणसाचा फायदा नाही.

समिती ही संघटना आहे. माणसे अनेक आणि मते अनेक असली हेकेखोरी बंडखोरी असली तरी विचार एक आहे. समितीच्या अंतर्गत वादाचे भांडवल करणाऱ्यांनी ही गोष्ट ध्यानात घ्यावी लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.