Saturday, April 20, 2024

/

‘बेळगावाला लागलेले ग्रहण सुटणार कधी’?

 belgaum

स्वच्छ बेळगावला स्मार्ट सिटीचा दुजोरा देऊन नागरिकांची दिशाभूल करण्यातच धन्यता मानणाऱ्या प्रशासनाला आता नागरिक वैतागले आहेत. शहरातील रस्त्यांची झालेली दुर्दशा पाहता यावरून चालत जाणे देखील धोक्याचे ठरत आहे. पावसाळा आला की रस्त्यांवरील खड्डे डोकेदुखी ठरत आहेत. त्यामुळे बेळगावला लागलेले खड्ड्यांचे ग्रहण सुटणार कधी? हा प्रश्न अनुत्तरीतच राहिला आहे.
बेळगाव हे भौगोलिक दृष्ट्या सुजलांसुफलांम असले तरी येथील समस्या कायम आहेत. रस्त्यांच्या निकृष्ट कामांमुळे अपघात वाढले आहेत. दररोज किरकोळ अपघात होतच असतात. याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे ही समस्या कायम आहे. रस्त्यांचे ग्रहण म्हणजे स्वच्छ बेळगावला लागलेले ग्रहणच म्हणावे लागेल.

Congres road shiv sena
मनापा प्रशासन आता स्मार्ट सिटी योजना राबविताना मुख्य समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष करते आहे. रस्ता ही नागरिकांच्या दृष्टीने महत्वाचा असला तरी त्या समस्येला बगल देत स्मार्ट सिटीचे गोडवे गाण्यातच येथील प्रशासन गुंग आहे. त्यामुळे खड्ड्यांचे स्वरूप वाढत आहे.
स्मार्ट सिटीत रस्त्यासाठी कोटी रुपये खर्च करण्यात आले असता देखील पडलेली ठिगळे बुजविण्याकडे साफ दुर्लक्ष केले जाते. काही रस्ते मागील काही महिन्यांपूर्वी तयार करण्यात आले आहेत. मात्र त्या रस्त्यांची अवस्था आज न पाहण्यासारखी झाली आहे. स्मार्ट सिटीचा बोलबाला करून नागरिकांची दिशाभूल करण्यातच प्रशासन धन्यता मानत आहे. यामुळे बेळगावला लागलेले ग्रहण बळावत चालले आहे.
खड्डे बुजविण्यात न आल्याने नागरिकांनी रस्त्यातच झाडे लावून प्रशासनाचा निषेध केला.

निवेदने, आंदोलने आणि इतर बरेच काही या रस्त्यासाठी करण्यात आले आहे. मात्र याची काळजी घ्यावी असे प्रशासनाला वाटले नाही. कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात येते. मात्र रस्ते करण्याकडे दुर्लक्षच होते. बाळेकुंद्री सारख्या गावात ६२ लाख रुपये रस्ता केल्याचे भासवून पैसे लुटण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे बेळगावात असे किती रस्त्यांची पैसे खाण्यात आले आहेत? हे अनुत्तरीतच आहे. रस्ता आणि खड्डे हे समीकरणच बनले आहे. त्यामुळे बेळगावला लागलेले ग्रहण सुटणार कधी? हे समजणे कठीण होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.