‘गो हत्त्या खपवून घेतली जाणार नाही- अंगडी

0
 belgaum

इतरांच्या आहार पद्धतीबद्दल आम्हाला अभिमान आहे खर आमची भावना समजावून घेणे देखील त्यांचे कर्तव्य आहे.राज्यात गोह्त्त्या बंद करण्यात सरकारी यंत्रणा अपयशी ठरली असून इथून पुढे गोहत्त्या अजिबात खपवून घेतली जाणार नाही असा इशारा खासदार सुरेश अंगडी यांनी दिला आहे.

bajrang dal
शनिवारी भाजप विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने गोहत्येाण विरुद्ध आंदोलन करण्यात आले.चन्नम्मा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत निषेध रली काढून आंदोलन केल त्यावेळी अंगडी बोलत होते.
राज्य सरकार गो हत्त्या थांबवण्यात पूर्ण पणे अपयशी ठरले असून बेळगावातील ऑटो नगर आणि यमकनमर्डी गोहत्या होत असल्याचा देखील आरोप त्यांनी केला . यावेळी बोलताना चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी म्हणाले की गोमाता ही राष्ट्रमाता आहे म्हणून तिचं रक्षण करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे त्यामुळे गोहत्त्या करणाऱ्यांना शोधून मारले पाहिजे.यावेळी माजी आमदार संजय पाटील,आमदार अनिल बेनके आदींनी आपले विचार व्यक्त केले.
यावेळी श्रीकांत कदम,कारंजीमठ नागनुर मुरुसावीर मठश्री,कित्तूर मठाचे स्वामीजी,राजू चिकनगौडर,आदी उपस्थित होते.

bg
bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.