Saturday, December 7, 2024

/

चारही स्थायी समित्यांच्या अध्यक्ष पदी मराठी भाषिकांची वर्णी

 belgaum

बेळगाव महा पालिकेच्या चारही स्थायी समितीच्या अध्यक्ष पदी मराठी भाषिक नगरसेवकांची वर्णी लागली आहे. गुरुवारी सकाळी महापौर बसप्पा चिकलदिनी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणुकीत तीन स्थायी समित्या अध्यक्षांची निवड बिनविरोध झाली तर एका स्थायी समितीच्या अध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली. निवडणुकीत तीन स्थायी समित्यावर मराठी नगरसेवकांच्या पाठींब्याने अध्यक्ष बनला तर एका स्थायी समितीवर कन्नड नगरसेवकांच्या पाठिंब्याने नगरसेविका वैशाली हुलजी यांनी अध्यक्ष पद मिळवलं आहे त्यामुळे त्यांना मराठी गटातून निलंबित करून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

standing comittee

आरोग्य स्थायी समितीच्या अध्यक्ष पदासाठी मराठी गटातून सुधा भातकांडे आणि कन्नड उर्दू गटाचे रवी धोत्रे यांच्यात निवडणूक झाली त्यात भातकांडे यांना ४ तर धोत्रे यांना ३ मते पडली त्यामुळे सुधा भातकांडे यात विजयी झाल्या.सार्वजनिक बांधकाम खाते स्थायी समितीच्या अध्यक्ष पदी नगरसेवक मोहन भांदुर्गे, तर अर्थ आणि कर स्थायी समितीच्या अध्यक्ष पदी पुंडलिक परीट यांची बिनविरोध निवड झाली.

हुलजी अध्यक्ष बनल्या मात्र मराठी गटातून नारळ..
ऑडीट स्थायी समितीच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नगरसेवक दिनेश रावळ आजारी असल्याने पालिकेत येऊ शकले नाहीत वैशाली हुलजी यांनी कन्नड नगरसेवक संजय सव्वाशेरी, सतीश देवर पाटील आणि शांता उप्पार यांच्या पाठिंब्याचे पत्र देऊन बिन विरोध झाल्या.
३२ मराठी नगरसेवकाचा गट एकसंघ ठेवू यावर एकमत झाल असताना केवळ अध्यक्ष पद मिळवण्यासाठी कन्नड नगरसेवकांचा पाठिंबा घेतला म्हणून नगरसेविका वैशाली हुलजी यांना मराठी गटातून नारळ देण्यात आला आहे.मराठी गट नेते संजय शिंदे यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत हुलजी यांना हुलजी यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्याचे स्पष्ट केले आहे.
निवड झालेले सदस्य खालील प्रमाणे आहेत..
आरोग्य स्थायी समिती-सुधा भातकांडे,विजय भोसले,अनिल मुचंडीकर,मनोहर हलगेकर, सुचेता गडगुन्द्री,रवी धोत्रे,बाबूलाल मुजावर,
अर्थ स्थायी समिती-रमेश सोनटक्क्की, मलसर्ज बळगनांवर,श्रेयल जनगौडा,पुंडलिक परीट, रतन मासेकर,रेणू मुतगेकर,रूपा नेसरकर
सार्वजनिक बांधकाम स्थायी समिती-मोहन भांदुर्गे,विनायक गुंजटकर,मीना वाझ, माया कडोलकर,रमेश कळसांनावर, दिनेश नाशिपुडी, मैनाबाई चौगुले
ऑडिट स्थायी समिती-राकेश पलंगे, वैशाली हुलजी,दिनेश रावळ, मीनाक्षी चिगरे, संजय सव्वाशेरी, सतीश देवरपाटील ,शांता उप्पार,

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.