Sunday, May 5, 2024

/

संगोळी रायन्ना ठेवीदारांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोंब

 belgaum

क्रांतिवीर संगोळी रायन्ना सोसायटीच्या ठेवीदारांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून सोसायटीच्या विरोधात बोंब ठोकली.’आम्हाला आमच्या ठेवी परत करा’अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली.

बेळगाव तालुक्यासह जिल्ह्यातील  अनेक नागरिकांनी या सोसायटीत ठेवी ठेवल्या आहेत. मात्र त्यांच्या ठेवी देण्यास टाळाटाळ केली जात आहे. याबाबत न्यायालयातही खटले दाखल करण्यात आले आहेत. तरी देखील पोलिस या सोसायटीच्या संचालक मंडळाच्या विरोधात कोणतेच पाऊल उचलत नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

APPUgol

 belgaum

अनेकांनी  मोठ्या काबाडकष्ट करून या सोसायटीत पैसे जमा केले आहेत. मात्र ती  रक्कम ठेवीदारांना देण्यास टाळाटाळ केली जात आहे. यामुळे आम्हाला  लवकरात लवकर आमच्या ठेवी मिळवून द्याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी संतप्त नागरिकांनी  बोंब मारून सोसायटीच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. बोंब मारून आंदोलन केल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात या आंदोलना विषयी चर्चा झाली होती.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.