Thursday, March 28, 2024

/

मयत शेतकऱ्यांच्या वारसास मदत देऊन केला कार्यारंभ

 belgaum

आमदार म्हणून निवडून आल्यावर जवळपास दोन आठवडया नंतर मतदार संघात दाखल झालेल्या लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मयत शेतकऱ्यांच्या कुटुंबास शासकीय आणि वयक्तिक मदत देऊन आपला आमदारकीचा कार्यारंभ केला आहे.

Laxmi helps farmer

बुधवारी सकाळी बेळगाव ग्रामीण मतदार संघात दाखल झालेल्या नवनिर्वाचित आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी चंदनहोसुर गावाला भेट दिली. त्या गावचे शेतकरी सिध्दप्पा बसरीकट्टी वय 52 यांनी कर्ज बाजारीने विष प्राशन करून आत्महत्या केली होती त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करत पाच लाखांचा मुख्यमंत्री निधीतून मदतीचा चेक वितरित केला याशिवाय लक्ष्मीताई फौंडेशनच्या वतीनं दहा हजारांची मदत देऊ केली. प्रांत अधिकारी कविता योगपन्नवर यावेळी होत्या.
एकीकडे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते बी एस येडीयुरप्पा शेतकऱ्यांची कर्जे माफ करा यासाठी आंदोलन करत आहेत तर दुसरीकडे संमिश्र सरकारातील हेब्बाळकर यांच्या सारखे आमदार आपल्या आमदारकीच्या कार्याची सुरुवातच मयत शेतकऱ्यांच्या कुटुंबियास आर्थिक मदत देऊन करतात ही कौतुकास्पद बाब आहे.
लक्ष्मी हेब्बाळकर या आमदार म्हणून निवडून येताच मतमोजणी रोजी 15 मे रोजी सायंकाळी बंगळुरूला रवाना झाल्या होत्या.त्या नंतर येडीयुरप्पा सरकारचा अविश्वास ठराव, नवीन सरकार बनवणे आणि  संभाव्य मंत्री मंडळ विस्तार यासाठी त्या सतत बेळगाव बाहेर होत्या. नवीन सरकार स्थापने नंतर त्या पहिल्यांदाच  म्हणजे तब्बल 15 दिवसांनी आपल्या ग्रामीण मतदार संघात दाखल झाल्या आहेत.बुधवारी त्यांनी पोलीस आणि ग्रामस्थांत वाद झालेल्या बेळवट्टीला देखील भेट दिल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.