जेष्ठ नेते राम आपटे यांच्या अध्यक्षतेखाली मध्यवर्ती समिती अध्यक्ष दीपक दळवी आणि शहर समितीचे अध्यक्ष किरण ठाकूर यांच्यात एकी संदर्भात महत्वपूर्ण बैठक होत आहे.वरील तिघेही नेते एका ठिकाणी येणार असून या बैठकीत काय होतंय याकडे साऱ्यांच लक्ष लागून राहिलं आहे.
मध्यवर्ती अध्यक्ष दीपक दळवी किरण ठाकूर आणि राम आपटे यांच्या व्यतिरिक्त चौथा कोणीही नेत्याला या बैठकीत सहभागी होणार नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.ठाकूर आणि दळवी दोन्ही कडे आलेल्या सर्व अर्जावर चर्चा करणार आहेत त्यामुळं या बैठकीत काय होतंय याची कुतहुलता निर्माण झाली आहे.
नेहमी प्रमाणे बेळगाव शहरात एकी होईल अन या एकीचे लोण सीमा भागात पसरेल अशी आशा सामान्य बेळगावकर व्यक्त करताना दिसत आहे