Saturday, April 20, 2024

/

निपाणी साठी प्रकाश हुक्केरींची लॉबिंग

 belgaum

सध्या बेळगाव जिल्ह्यात राष्ट्रीय पक्षातून मतदार संघ बदलाचे वारे वहात आहेत दोघात सोडून तिसरा कोण अशी स्थिती प्रत्येक मतदार संघात असताना अनेक दिग्गज नेत्यांत तिकीट साठी लढत सुरू आहे.

चिकोडीचे खासदार रमेश कत्ती यांनी बेळगाव उत्तर मधून भाजपकडून उमेदवारी साठी अर्ज दाखल केला असताना चिकोडीचेच विध्यमान खासदार प्रकाश हुक्केरी हे निपाणी मधून काँग्रेस मधून निवडणूक लढवण्यास इच्छुक असून तिकीट साठी दिल्ली दरबारी लॉबिंग करत आहेत.
निपाणी आमदार शशिकला जोल्ले यांचे पती अण्णासाहेब जोल्ले हे चिकोडी विधानसभा मतदार संघात भाजपातुन तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत जोल्ले परिवाराला शह देण्यासाठी म्हणून हुक्केरी देखील निपाणी मधून प्रयत्न करत आहेत.शशिकला जोल्ले या भाजपच्या निपाणीच्या आमदार आहेत तर गणेश हुक्केरी हे चिकोडी सदलगा आमदार आहेत.

प्रकाश हुक्केरी हे काँग्रेसच्या बेळगावच्या राजकारणा तील दिग्गज नेतृत्व आहे त्यांचे पुत्र गणेश हुक्केरी हे सदलगा चिकोडीचे आमदार आहेत निपाणी भाजप आमदार शशिकला जोल्ले यांचे पती चिकोडीतून भाजप साठी प्रयत्नशील असल्याने गणेश हुक्केरी यांचे वडील प्रकाश हुक्केरी हे निपाणीतुन सीट मिळावी यासाठी जोरदार प्लॅनिंग करत आहेत या निमित्ताने हुक्केरी विरुद्ध जोल्ले यांच्यातील संघर्ष वाढत चालला आहे हुक्केरी यांच्या लॉबिंग मुळे निपाणीचे माजी आमदार काका पाटील मात्र यांचे टेन्शन वाढले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.