Saturday, July 27, 2024

/

३१ तारखेच्या सभेची जोरदार तयारी सुरू

 belgaum

राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रमुख आणि सीमावासीयांचे आधारस्थंभ नेते शरद पवार यांच्या ३१ मार्च रोजी होत असलेल्या जाहीर सभेची जोरदार तयारी सुरू आहे.
सिपीएड मैदानावर ही सभा होत असून मैदानावर व्यासपीठ उभारणीचे काम जोरात सुरू आहे, लोकांना बसण्याची व्यवस्था व पार्किंग याकडेही महाराष्ट्र एकीकरण समितीने लक्ष दिले आहे. ही सभा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर होत असून सीमाप्रश्नाच्या लढ्यात महत्वाची ठरणार आहे.

सध्या गावोगावी मेळावे घेऊन या सभेसाठीची जागृती करण्यात येत आहे. शरद पवार यांचे बोल ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार समिती नेते आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
शरद पवार यांनी १९८६ मधील कन्नड सक्ती आंदोलन बेळगावात येऊन गाजवले होते, त्यानंतर राष्ट्रीय राजकारणात ते व्यस्त होते मात्र पुन्हा एकदा सीमाप्रश्नाच्या लढ्यास बळकटी देण्यासाठी ते येत असल्याने नागरिकांनी चलो सिपीएड असा नारा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.