Friday, March 29, 2024

/

‘हिंदुत्व मराठी’साठी लढणाऱ्या युवकांचा आवाज रत्नप्रसाद

 belgaum

उत्तर बेळगावात बऱ्याच दंगली होत असतात यात होरपळणारा समाज हा मराठाच असतो यासाठी दंगलग्रस्त भागातला हिंदुत्व आणि मराठी साठी काम करणारा युवक म्हणून चव्हाट गल्लीतील रत्न प्रसाद पवार यांची ओळख आहे.राज्य द्रोह खटला अंगावर घेणाऱ्या पवार यांच्या कडे बेळगाव उत्तर बेळगावचा इच्छुक म्हणून युवकातून मागणी वाढत आहे.

 

 belgaum

काळ्या दिनाच्या फेरीत जेंव्हा अटक झाली आणि गुन्हे दाखल झाले तेंव्हा मला सोडवायला फक्त समिती आली. हिंदुत्ववादी नेते कधी आले नाहीत. आम्ही मग आपण का आपला समाज व समितीसाठी काम करू नये हा विचार माझ्या मनात आला तेंव्हापासून काम सुरू केलोय. आज काही माझ्याच विचारांचे कार्यकर्ते मला भेटून आपण खिशातून पैसे खर्च करतो तू निवडणुकीला बस असे सांगत आहेत.तुझ्यात एक धम्मक आहे तू प्रयत्न करून बघ असे सांगू लागलेत यामुळेच नेत्यांना भेटण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती रत्न प्रसाद पवार यांनी बेळगाव live शी बोलताना दिली.

हिंदुत्व आणि मराठीपण या दोन्हीसाठी लढणारा कार्यकर्ता म्हणून माझी चर्चा सुरू झाल्यावर सोशल मीडियावर ८० टक्के लोकांनी पाठींबा दिला आहे. आपली चर्चा होते लोक आपला माणूस मानतात यातच समाधान मोठं आहे.
आणखी एक इच्छूक अमर येळ्ळूरकर यांनीही म्हटले की तिकीट कुणालाही मिळो एकमेकाला पाठींबा देऊन काम करूया पण समितीच्या विचारांचा विजय घडवून आणूया. आजपर्यंत भाजपने तरुणांचा फक्त वापर केला आहे, त्यासाठी आज आम्ही नवी चळवळ उभी करण्याची गरज आहे. आज हिंदू विरुद्ध मुस्लिम करून स्वतःला फायदा करण्याचा प्रयत्न सुरू आहे असेही ते म्हणाले

हिंदुत्व कार्यकर्ते कधी आमच्या मराठीच्या मुद्द्यावर मोर्चा काढत नाहीत. सीमाप्रश्न सगळ्या मराठी जनतेचा आहे. या जनतेचं कायम खच्चीकरण चालू आहे, हा समाज मागे राहिला, यामुळे ३६ व्या  वर्षी समाजासाठी स्वतःचा पूर्णवेळ देण्यास तयार आहोत असा देखील दावा त्यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.