Friday, May 3, 2024

/

कणबर्गीच्या शेतकऱ्यांचा आत्महत्येचा इशारा

 belgaum

बुडाने कणबर्गी येथील पिकाऊ शेत जमीन वसाहतीसाठी संपादित करण्याचा प्रयत्न केल्यास गळफास घेऊन आत्महत्या करू असा इशारा कणबर्गी गावच्या शेतकऱ्यांनी दिला आहे.
या भूसंपादनाविरोधात माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्या नेतृत्वाखाली बुडावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

Kanbargi farmers
शेतकऱ्यांनी आपापल्या घरासमोर दोरखंडाचे फास तयार करून ठेवले आहेत. जमिनीला हात लावला तर संपूर्ण कुटुंबातील सदस्य फास लावून घेऊ असा इशारा या फासात डोकी अडकवून त्याचे फोटो काढून देण्यात आला आहे.
हे फोटो सध्या सगळीकडे पसरत असून गोंधळ माजला आहे. बुडाच्या अन्यायाला कंटाळून शेतकरीवर्गाने हा पवित्रा घेतल्याने खळबळ माजली आहे.
शुक्रवारच्या मोर्चात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत, अशी माहिती आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.