belgaum

?मेष-या सप्ताहात अपणास शुभफल दायी राहील.मुलां संबंधी काही चांगली बातमी मिळेल त्यामुळे मन प्रसन्न राहील.घरात एखादे मंगलकार्य जमण्याचे योग्य येतील.विद्यार्थ्यांना अनुकूल कल आहे तयामुळे अभ्यासात प्रगती कराल.महिलांना कुटूंब सुख लाभेल.
?वृषभ-सामान्यतः हा सप्ताह आरोग्याच्या दृष्टीने विशेष चांगला जाणार नाही.तसेच आर्थिक बाबतीतही त्रास राहील हा सप्ताह पैशाची ओढाताण होईल त्यामुळे खर्च जपून करावा.काही घरगुती समस्या डोके वर काढतील.परंतु बाकी गोष्टीसाठी हा सप्ताह तसा बरा राहील.एखाद्या सभा समारंभात भाग घ्याल.किंवा त्या संदर्भात प्रवास होईल.
?मिथुन-यासप्ताहात आपल्याला पराक्रम दाखवण्याची संधी मिळेल.भाग्याचीही साथ राहील.मागे अर्धवट राहिलेली कामे या सप्ताहात पूर्ण कराल.यासाठी मित्राची साथ मिळेल.व्यावसायिकांना व्यवसायात लाभ होईल.विद्यार्थी वर्गाने अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नये.सर्वसाधारण हा सप्ताह आपणास चांगला राहील.
?कर्क-या सप्ताहात खाण्या पिण्याच्या सवयी वर नियंत्रण ठेवावे करण या काळात पोटाच्या तक्रारी जाणवतील.त्यामुळे अस्वस्थ वाटेल तसेच व्यापारी वर्गाने या काळात कोणतीही नवीन गुंतवणूक करू नये. नुकसान होईल.अचानक एखादे नुकसान होऊं शकते.नोकरीत असणाऱ्यांनी वरिष्टची मर्जी सांभाळावी.
?सिंह-हा सप्ताह आपणास मध्यम फल दायी राहील या काळातसप्ताहाची सुरुवात जरी विशेष चांगली नसली तरी आपण उत्तरार्धात आपण त्याची उणीव भराल.विद्यार्थी वर्गाला करियर संबंधित एखादी संधी उपलब्ध होईल.अनपेक्षित लाभ होतील. वयस्कर व्यक्तींना पाठीची दुखणी जाणवतील.
?कन्या-सप्ताहाच्या सुरवातीला एखादी समस्या सोडली तर बाकी काळ उत्तम जाईल.सरकारी कामात यश मिळेल किंवा त्या संदर्भात ची कामे पूर्ण होतील.कर्ज प्रकरणात यश राहील.महिलांना कुटूंब सौख्य लाभेल.
?तुला-मुलांनी या काळात अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे यश मिळेल.घरात पाहुणे येतील.महिलांना लहान सहलीचा आनंद घेता येईल.नोकरी वर्गाने या काळात नवीन कार्यात यश मिळेल.विवाहयोग्य मुलामुलींचे विवाह जुळून येतील.व्यापारी वर्गाला भागीदारीत यश लाभेल.नोकरी पेशा लोकांना बदलीचे योग येतील.
?वृश्चिक-या काळात घरात वादाचे प्रसंग निर्माण होतील .त्यामुळे महिलांनी शांतराहिले तर उत्तम प्रॉपर्टी संबंधित व्यवहार जपून करावे कागद तपासून घ्यावे.काही गोष्टी मन प्रमाणे न झाल्याने मन उदास राहील.तसा हा सप्ताह आपणास सर्व साधारण राहील.मुलांनी संयमाने राहावे.
?धनु-या सप्ताहात आपण आपल्या बुद्धी च्या जोरावर पराक्रम दाखवाल.कुठल्याही कामात यश देणारा कल आहे.समाजात मान सन्मान मिळेल.मित्राचे व नातेवाईकाचे सहकार्य मिळेल.महिलांना खरेदी चा आनंद घेता येईल. हा सप्ताह आपणास उत्तम असा राहील.
?मकर-या सप्ताहात वयस्कर लोकांना गुडघ्या संमधी आजार होतील.नोकरीच्या प्रयत्न करणार्यांना नोकरी मिळेल.महत्वाच्या कामा साठी प्रवास होईल.परंतु आपण करत असणाऱ्या कामात गुप्तता बाळगा.यश नक्की मिळेल.बोलताना या काळात कुणाचे मन दुखवले जाणार नाही याची काळजी घ्यावि.हा सप्ताह काही बाबी सोडता तसा ब रा राहील.
?कुंभ-या काळात धार्मिक कार्यात भाग घ्याल.या काळात आपला आत्म विश्वास वाढेल त्यामुळे कामाला गती येईल. घरातील वातवरण अनुकूल राहील तसेच महिलांना एखाद्या धार्मिक स्थळांना भेटीचा योग येईल.नवीन काही सुरू करण्यास योग्य काळ आहे.विदयार्थी वर्गाने अभ्यास करताना मन शांत
ठेवावे.
?मीन-अनावश्यक खर्च वाढतील.त्यामुळे महिन्याचे बजेट कोलमडेल.आवक या महिन्यात तसा कमी राहील.याकाळात भावंडसोबत वादाचे प्रसंग उद्भवू शकेल.मागील काही घडलेल्या गोष्टीचा पश्चाताप होईल. उष्णतेचे विकार जाणवतील नवीनविवाहिताना संतान प्राप्ती होईल.
?ज्योतिषी?
उषा सुभेदार
कोरे गल्ली, शहापूर,
बेळगाव
8762655792

bg

 

bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.