belgaum

लैंगिक अल्पसंख्याकांच्या संघर्षाची यशोगाथा :’तल्की – ट्रुथ ड्रीम’

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : लैंगिक अल्पसंख्याक समुदायाचे वैविध्यपूर्ण जीवन, त्यांचे संघर्ष आणि त्यांची स्वप्ने रंगभूमीच्या माध्यमातून समाजासमोर आणण्यासाठी एक अनोखा कलात्मक प्रयोग बेळगावात सज्ज झाला आहे. ‘पयणा’ आणि ‘सावली फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या, रविवारी सकाळी ११:३० वाजता बेळगाव येथील कुमार गंधर्व हॉलमध्ये ‘तल्की – ट्रुथ ड्रीम’ (Talki – Truth Dream) या नाटकाच्या ४४ व्या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.

या संदर्भातील माहिती आज बेळगावात आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. सामाजिक कार्यकर्त्या आणि कलाकार चांदनी यांच्या संकल्पनेतून साकारलेले हे नाटक गेल्या काही वर्षांत अत्यंत लोकप्रिय ठरले आहे. ‘पयणा’ संस्थेच्या सह-संस्थापिका असलेल्या चांदनी यांनी २०२१ मध्ये या रंगभूमी प्रयोगाची सुरुवात केली होती.

यापूर्वी कर्नाटक, दिल्ली, अहमदाबाद, बडोदा आणि मैसूर येथील प्रमुख नाट्यमहोत्सवांमध्ये या नाटकाचे ४३ प्रयोग यशस्वीपणे पार पडले असून, प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली आहे. विशेष म्हणजे या नाटकावर आधारित ‘कन्नडी’ नावाचे कथापुस्तक कन्नड आणि इंग्रजी भाषेत प्रकाशित झाले असून, या प्रयोगाचे पुढचे पाऊल म्हणून यामध्ये ५८ वर्षांवरील ट्रान्सजेंडर आणि तृतीयपंथीय समुदायातील ज्येष्ठ नागरिक मुख्य भूमिकेत सहभागी होत आहेत.

 belgaum

हे नाटक तृतीयपंथीय समुदायाच्या जीवनातील वास्तविकता, त्यांच्यासमोरील आव्हाने आणि सुख-दुःखाचे खरे प्रतिबिंब मांडणारे आहे. श्री जितू सुंदरम यांच्या दिग्दर्शनाखाली आणि रेवती यांच्या सह-दिग्दर्शनात साकार होणाऱ्या या नाटकात चांदनी (शकुंतला), भानू (जयामालिनी), लक्ष्मी (मैसूर महारानी), शांतम्मा (आदिवासी महिला), देवी यांच्या माता सरवणा, आंदाळ (रेवती ए.) आणि अर्धनारीश्वर (शोभनाकुमारी) यांच्यासह शोभना, शकीला, लक्ष्मम्मा, भानम्मा, शांतम्मा आणि रेवती हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत.

बेळगाव जिल्ह्यात लैंगिक अल्पसंख्याकांना सन्मानाचे आणि स्वतंत्र जीवन मिळवून देण्यासाठी कार्यरत असणाऱ्या ‘सावली फाउंडेशन’ आणि ‘पयणा’ संस्थेने या अनोख्या कलात्मक प्रयोगाचे साक्षीदार होण्यासाठी सर्व नागरिकांना आणि रसिक प्रेक्षकांना जाहीर आमंत्रण दिले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.