belgaum

रोहित पवारांच्या उपोषणाला बेळगावातून पाठिंबा

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह :राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, या प्रमुख मागणीसाठी पंढरपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला बेळगावातूनही पाठिंबा मिळाला आहे. श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर आणि कृतिशील मराठा समाज, बेळगावचे समन्वयक अमित देसाई यांनी पंढरपूर येथे जाऊन आमदार रोहित पवार यांची भेट घेत उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला.


यावेळी रोहित पवार यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ देण्यात आलेले निवेदनही सादर करण्यात आले. या निवेदनात महाराष्ट्रातील शेतकरी अवर्षण, निसर्गाची अवकृपा, उत्पादन खर्चातील वाढ आणि आर्थिक संकटामुळे मोठ्या अडचणीत सापडल्याचे नमूद करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन न्याय मिळावा, अशी भूमिका व्यक्त करण्यात आली आहे.


निवेदनात पुढे म्हटले आहे की, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी रोहित पवार यांनी सुरू केलेले उपोषण हे काळाची गरज असून ते सत्य व लोकहिताचे आंदोलन आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत त्यांनी घेतलेली भूमिका दिशादर्शक असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
श्रीराम सेना हिंदुस्थान, महाराष्ट्र एकीकरण समिती (बेळगाव) आणि कृतिशील मराठा समाज या संघटनांनी एकत्रितपणे या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. मराठी बांधवांच्या भावना आणि सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणून आम्ही या आंदोलनाच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

 belgaum


शेतकऱ्यांना संपूर्ण न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू राहील आणि केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
रोहित पवार यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शविणाऱ्या निवेदनावर श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर तसेच कृतिशील मराठा समाजाचे समन्वयक अमित देसाई यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.यावेळी
विजय बाडीवाले,राजेंद्र बैलूर,विनोद बिर्जे उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.