Thursday, April 18, 2024

/

सॅटरडे नाईट ला रात्रभर धिंगाणा

 belgaum

शनिवारी रात्री म्हणजे सध्या जिथे छापा सुरू आहे ते ठिकाण सध्या तरुण तरुणी आणि आधुनिक विचारांच्या लोकांसाठी शनिवारची रात्र विकेंड नाईट आऊट करण्याचे ठिकाण बनले आहे, अशी माहिती मिळाली आहे.
या संदर्भातील माहिती आणि तक्रारी दाखल झाल्यावरच पोलीस आयुक्तांनी छाप्याचा निर्णय घेतला असण्याची शक्यता आहे.
सध्याच्या मॉडर्न राहणीमानात नाईट क्लब, मध्याच्या पार्टीत नाच आणि गाणे अशे प्रकार जोरात सुरू आहेत, अशी सोय मिळाली की मेडिकल कॉलेज चे विध्यार्थी आणि तरुण तरुणी अशा पब संस्कृतीकडे वळत आहेतNight club raid
किर्लोस्कर रोडच्या त्या टाऊन मध्ये टॉप ठरणाऱ्या हॉटेलात जेवण खान, बार आणि आता अलीकडच्या काळात ही नाईट आऊट ची सोय सुरू झाल्यापासून येथील शनिवारी रात्रीची गर्दी वाढत होती. रात्रभर नशेत धिंगाणा घालायचा आणि रविवारची सुट्टी झोपून काढायची असे प्लॅनिंग करणाऱ्यांना हा क्लब आवडीचा ठरत आहे, असे असताना धाड पडल्याने पोलिसांनी चांगली कारवाई केली अशी चर्चा किर्लोस्कर रोड आणि भागात सुरू आहे.

बार असो किंवा पब बेळगाव च्या पोलिसांच्या नियमानुसार रात्री ११ किंवा जास्तीत जास्त बारा पर्यंत बंद होणे महत्त्वाचे असते, पण हा क्लब शनिवारी पूर्ण रात्रभर सुरू राहतो आणि सकाळी लोक उतारा करूनच घरी जातात असे उघड झाले आहे.
रात्रीच्या क्लब बद्दल कुणाला त्रास झाला की बिझनेस च्या दुुष्मनीं तुन तक्रार झाली की पोलिसांनी स्वतः होऊन ही कारवाई केली हे अजून उघड व्हायचे आहे.
फक्त यातून काहीतरी ठोस व्हावे ही कारवाई हप्ता वाढवून घेण्यासाठी ठरू नव्हे, अशी इच्छा छाप्याची बातमी समजणाऱ्या व्यक्ती बोलुन दाखवत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.