Friday, April 26, 2024

/

बहिणीच्या नवऱ्याचा खून

 belgaum

बहीण आणि भावोजीत सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी गेल्यानंतर मेहुण्याकडूनच बहिणीच्या नवऱ्याचा खून झाल्याची घटना निपाणी येथील हीदायतनगर येथे मंगळवारी रात्री घडली.
रमजान मलिकजान आरब (वय ४६) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. हैदरअली गुलाबमहमद मुजावर (वय ३०) याने त्याला संपवले आहे.
घटनेनंतर आरोपी मुजावर हा स्वतःहून पोलिसात हजर झाला.  संशयित आरोपी हैरदअली मुजावर याच्या बहिणीशी रमजान आरब (मूळगाव हिरेकुडी, सध्या रा. डॉ. आंबेडकरनगर-निपाणी) यांच्याशी झाला होता. दोन वर्षापूर्वी रमजान आरब हा हिरेकुडी सोडून डॉ. आंबेडकरनगरात रहावयास आला होता. शहरात वाहनांना ग्रीस लावण्याचे काम करून त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरु होता. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास हैदरअली व त्याच्या पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून कडाक्‍याचे भांडण झाले. यावेळी हैदरअलीने आपल्या पत्नीला बेदम मारहाण केली. त्यामुळे हैदरची आई आपला जावई रमजान याला भांडणाची माहिती सांगण्यासाठी डॉ. आंबेडकरनगरात गेली. तेथून रमजानने हिदायतनगरातील हैदरअलीच्या घरी जावून भांडण न करण्याची सूचना केली.

यावेळी हैदरअलीने आपल्या घराची चौकशी न करता निघून जाण्याचा सल्ला रमजानला दिला. यावेळी किरकोळ बाचाबाची झाली. त्यानंतर पुन्हा पती-पत्नीत भांडण जुंपले. ते सोडविण्यास रमजान गेला असता हैदरअलीने रमजानच्या छातीखाली सुरा खुपसला. त्यावेळी घरातील नागरिकांनी रमजानला सोडवून घेऊन महात्मा गांधी रुग्णालयात दाखल केले. रक्तस्त्राव झाल्याने त्याला कोल्हापुरमधील सीपीआर रूग्णालयात दाखल केले. तेथे मंगळवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास रमजानचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच आरोपी हैदरअली स्वतःहून निपाणी शहर पोलिस ठाण्यात हजर झाला.

हैदरअली हा कोंबड्या, बकऱ्यांची कुर्बानी देण्याचे काम करत होता. दररोज पती-पत्नीत वाद होत असल्याने त्यातूनच हा प्रकार घडला. बुधवारी सकाळी बेळगावचे अतिरिक्त पोलिस प्रमुख रवींद्र गडादी, मंडल पोलिस निरीक्षक किशोर भरणी, सहाय्यक फौजदार एम. जी. निलाखे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. कोल्हापूर येथील सीपीआर रूग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. मृत रमजान अरब याच्या मागे पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे. शहर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.