Tuesday, April 23, 2024

/

सुभाषनगर येथे घर फोडले ,लाखोंचा ऐवज लंपास 

 belgaum

सदाशिवनगर येथे महिलेच्या तोंडात गोळा कोंबून लाखोंचा दरोडा घातलेली घटना ताजी असतानाच शहरातील सुभाष नगरयेथील एका घराचा कुलूप तोडून दिवसा ढवळ्या लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली आहे. शहर आणि परिसरात नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी जोरदार सुरु असताना चोरटयांनी हा डल्ला मारला आहे.
रफिक सनदी सुभाष नगर दुसरा क्रॉस मध्ये ही घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रफिक देसाई यांचे कुटुंबीय शनिवारी सकाळी घराला कुलूप लाऊन पाहुण्यांच्या घरी गेले असता अज्ञातांनी प्रवेश करून कपाटाचा कुलूप तोडून २ लाख रुपये रोख रक्कम आणि १०० ग्रॅम सोन्याचे दागिने पळवले आहेत. चोरटयांनी घरातील सर्व सामान विस्कटले होते .
एकीकडे शहरात वाढलेल्या दरोडा आणि चोऱ्यांच्या घटने नंतर पोलिसांनी रात्रीची गस्त वाढलेली आहे त्यामुळेच दिवसा ढवळ्या देखील चोऱ्यांचे प्रकार वाढले आहेत .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.