Saturday, April 27, 2024

/

बेळगावातील विध्यार्थ्याचे  पुणे येथील अपघातात निधन

 belgaum

लिंगराज कॉलेज बी बी ए(पाचव्या सेमिष्टर)मध्ये शिकणाऱ्या बेळगावातील एका युवकाचा पुणे येथे झालेल्या अपघातात मृत्यु झाला आहे.सागर अनिल महाजन वय १९ रा न्यू गुडस रोड शास्त्री नगर बेळगाव अस त्या मयत झालेल्या दुर्दैवी युवकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहिती नुसार सदर युवक कॉलेजच्या कामा निमित्य पुणे येथे गेला असता शुक्रवारी मध्यरात्री हा अपघात झाला आहे.कॉलेजच्या प्रोजेक्ट साठी गेले एक महिना सागर हा पुणे येथेच होता काल रात्री त्याचा केरळीयन मित्र सागर दोघेही दुचाकी वरून जात असतेवेळी टिप्परने धडक दिल्याने दोघेही जागीच ठार झाले आहेत. सागर हा दुचाकीवर मागे बसला होता. आगामी दोन दिवसात प्रोजेक्ट संपवून घरी परतणार होता तेवढ्यात काळाने त्याच्यावर झडप हा अपघात घडला आहे.

sagar mahajan

 belgaum

मयत विध्यार्थ्याचे वडील अनिल महाजन हे हॉंगकॉंग ला नोकरीला असतात ते सायंकाळी दुपारी दिल्लीला येणार असून त्यानंतर ते बेळगावात येणार आहेत ते आल्यावरच  रविवारी सकाळीच अंतिम संस्कार केला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.