Saturday, April 20, 2024

/

 ब्रॉकायटीस (श्वासनलिकादाह)- वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स

 belgaum

Dr sonali sarnobatब्राँकायटीस म्हणजेच श्वासनलिकादाह होय. घेतला जाणारा प्रत्येक श्वास हा मुख्य श्वासनलिकेतून उपश्वासनलिकेत जातो या पैकी एक उजव्या फुफ्फुसात तर एक डाव्या फुफ्फुसात जाते. तेथून पुढे मग या नलिकांना आणखी फाटे फुटतात आणि सर्वात छोट्या श्वासवाहिका श्वासकोषिकांमध्ये जाऊन संपतात. येथे श्वासातून ऑक्सीजन व कार्बनडाय ऑक्साईडची देवाणघेवाण होते. यापैकी क्रियेमध्ये अडथळा होण्यासाठी संसर्गजन्य किंवा अ‍ॅलर्जिक विकार पुरेसा असतो. या श्वासनलिकांचा दाह म्हणजे ब्राँकायटिस होय.
कारणे-
1. अक्यूट- विषाणू, जिवाणू यांच्या संसर्गामुळे किंवा अ‍ॅलर्जीमुळे हा दाह होतो.
2. क्रॉनिक- सातत्याने संसर्ग किंवा दाह घेत राहिल्यास क्रॉनिक ब्राँकायटिस होतो. धुम्रपान करणार्‍या व्यक्तींना याचा सर्वाधिक धोका असतो.
लक्षणे- सतत छाती भरणे, कफ भरणे, साधारण किंवा तीव्र स्वरूपात खोकला येणे. अंगदुखी, कणकण, ताप क्वचित सर्दी अशी लक्षणं आढळून येतात. तीव्रता जर जास्त असेल तर धाप लागणे, भरपूर ताप येणे असेही त्रास होऊ शकतात. लक्षणं जरी साधीच वाटली तरी त्या व्यक्तीला सतत जर असा त्रास होऊ लागला तर त्याचा दैनंदीन जीवनावर परिणाम होतो. तब्येत खालावते. भूक लागत नाही. रक्ततपासणी मध्ये पांढर्‍या पेशी वाढलेल्या आढळून येतात.
उपचार- रूढ उपचारांमध्ये अँटीबायोटिक्स व अँटीइन्फ्लेमेटरी अशी औषधे वापरता येतात. त्यामुळे विषाणू व जीवाणूंचा संसर्ग तरी थांबतो, पण जर हे इन्फेक्शन पुन्हा पुन्हा होत असेल तर त्यावर होमिओपॅथी सारखे औषध नाही. पाहुया होमिओपॅथिक औषधांची काही उदाहरणे.
1.नॅट्रमसल्फ्- अ‍ॅलर्जीच्या इओसिनोफील नावाच्या पेशी वाढलेल्या आढळून येतात. छातीमध्ये खसखसते, कफाची घुरघुर असते.
2. काली कार्ब- घट्ट, चिकट कफ असतो. कफाचा पिवळटपणा जास्त असतो. छातीत दुखते, कंबर दुखते, जुनाट कफासाठी उपयुक्त.
3. पल्सेटिला- अतिशय संवेदनशील व मवाळ रूग्ण पिवळट हिरवट कफ. दुखणे/ आजार अजिबात सहन होत नाही. सतत तक्रारी सांगत रहाव्या वाटतात.
4. कार्बोव्हेज- हातपाय एकदम थंड पडतात. छातीत कफ धरतो. चेहरा, हातपाय निळसर दिसतात. रुग्ण खूप आजारी भासतो.
5. याशिवाय मेडोरिनम, इनाफ्लुएन्झीनम्, थुजा, इपेकॅक अशी अनेक औषधं व्यक्तीवैशिष्टयानुसार वापरता येतात.
याशिवाय ब्राँकियॅक्टॅसिस नावाचाही एक विकार आहे. ज्यामध्ये श्वासनलिका कोरडी होते व कफ अजिबात काढता येत नाही. कफ पूर्ण वाळतो पण आत असल्याची जाणीव मात्र होत रहाते. यावरही उत्कृष्ट होामिओ औषधे उपलब्ध आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.