Thursday, May 9, 2024

/

ठळकवाडी स्कुलच्या माजी विद्यार्थ्यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा

 belgaum

शाळेतील विशेषतः हायस्कुलमधील जुन्या आठवणी प्रत्येकाच्या हृदयाच्या कप्प्यात बसलेल्या असतात अश्याच आपल्या हायस्कुल जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा ठळकवाडी हायस्कुलच्या १९९८ बॅच च्या दहावीच्या विध्यार्थ्यानी दिला आहे .
तब्बल २० वर्ष नंतर हे सगळे विध्यार्थी एकत्रित जमले होते त्यांनी केवळ आठवणींना उजाळा न देता आपलं कर्तव्य म्हणून माजी मुख्याध्यापक जे व्ही खांडेकर,सध्या कार्यरत असलेले शिक्षक सी व्ही पाटील आजी माजी शिक्षक आणि कर्मचारी सह्या एकूण १७ जणांचा सत्कार देखील केला आहे .thalakvadi gathering
या निमित्ताने हायस्कुल मध्ये एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी मुख्यध्यापक जे व्ही खांडेकर यांनी भूषविले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण संस्थेचे शानभाग उपस्थित होते . एकूण ६० माजी विध्यार्थ्यानी या कार्यक्रमास हजेरी लावली होती . शिक्षकांच्या वतीने सावंत यांनी तर विजापूर जे एम एफ सी कोरतात न्यायाधीश असलेले माजी विद्यार्थी दीपक पाटील विध्यार्थ्यांच्या वतीने मनोगत व्यक्त करत गुरुजन आणि कर्मचारी शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली . माजी विद्यार्थ्यांनी शाळेला आर्थिक मदत देखील देऊ केली .

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.