Monday, April 29, 2024

/

सुंठकरांच्या भाजप प्रवेशानंतर तालुका समितीची सोमवारी बैठक

 belgaum

माजी महापौर तालुका समितीचे उपाध्यक्ष शिवाजी सुंठकर यांच्या भाजप प्रवेशा नंतर तालुका महारष्ट्र एकीकरण समितीच्या महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. कार्याध्यक्ष वाय बी चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली हि बैठक सोमवारी दुपारी तीन वाजता जत्तीमठात आयोजित केली आहे.

संघटना बळकट करणे यासह सध्य स्थितीत चालू असलेल्या घडामोडीवर सखोल विचार विनिमय या बैठकीत होणार आहे . तालुका समितीचे कार्याध्यक्ष वाय बी चौगुले सरचिटणीस मनोज पावशे,उपाध्यक्ष म्हात्रू झंगरुचे सुरेश डुकरे,ए पी एम सी अध्यक्ष अप्पा जाधव भावकाना पाटील यल्लाप्पा बेळगावकर पिराजी मुचंडीकर खजिनदार सुनील अष्टेकर माजी तालुका पंचायत सदस्य सागर पाटील यांनी केले आहे. सुंठकर यांच्या भाजप प्रवेशा नंतर ही पहिलीच बैठक असल्याने या बैठकीत किती कार्यकर्ते जमतात काय निर्णय घेतले जातात याकडे सर्वांच लक्ष असणार आहे.

सुंठकर भाजपात गेले म्हणजे आम्ही पण भाजपात जाईल असे नाही रिक्त असलेली पद भरून पुन्हा जोमाने कामाला लागू यासाठीच विचार विनिमय करण्यासाठी या बैठकीचे आयोजन केलेले आहे अशी प्रतिक्रिया सरचिटणीस मनोज पावशे यांनी बेळगाव live ला दिली आहे.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.