Friday, March 29, 2024

/

 हेमू कलानी चौकाच्या सुशोभीकरण कामास सुरुवात

 belgaum

शहरातील हेमू कलानी चौकाच्या सुशोभिकरण कामाची महापौर संज्योत बांदेकर यंच्या हस्ते सुरुवात झाली आहे. १४ व फायनान्स निधीतून पाच लाखांचा निधी या चौकाच्या सुशोभीकरणास मंजूर झाला होता त्या कामाची रीतसर सुरुवात सोमवारी करण्यात आली.

सिंधी समाजाच्या मागणीनुसार माजी महापौर सरिता पाटील यांच्या प्रयत्नातून हा निधी मंजूर करण्यात आला होता. या वेळी स्थानिक नगरसेविकानगरसेविका रेणू मुतगेकर, माजी महापौर सरिता पाटील माजी नगरसेवक रणजीत चव्हाण पाटील,माजी उपमहापौर सतीश गोरगोंडा,पालिका अभियंता शेट्टर,पाटील यांच्यासह सिंधी समाजाचे अध्यक्ष देखील उपस्थित होते. गेल्या आठवड्यात हुतात्मा चौकाच्या सुशोभीकरणास सुरुवात झाली होती त्या नंतर लगेचच हेमू कलानी  चौकाच्या सुशोभीकरणास सुरुवात झाल्याने या भागात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.hemu kalani chouk

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.