Friday, March 29, 2024

/

घसा बसणे-वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स

 belgaum

DR sonaliबोलताना किंचित घोगरा आणि कर्कश आवाज येत असल्यास ’घसा बसणे’ असे म्हटले जाते. साध्या सर्दीपासून ते अगदी घशाच्या कॅन्सरमुळे घसा बसू शकतो. त्यामुळे हा विकार म्हणाल तर अगदी साधा अन्यथा अतिभयंकर ठरू शकतो. घसा बसतो म्हणजे नेमकं काय होतं?
* स्वरयंत्राच्या तारांच्या हालचाली बिघडतात किंवा
स्वरयंत्राच्या तारा एकमेकाला चिकटतात किंवा
* स्वरयंत्रावर मांस वाढते किंवा
* स्वरयंत्राच्या तारांवर जास्त ताण पडतो.
कारणे-
* जन्मजात स्वरयंत्रावर गाठ असणे.
* वेडेवाकडे आवाज काढून बोलणे किंवा सतत कर्कश ओरडणे, भसाड्या आवाजात गाणी म्हणणे किंवा अति खोकणे, यामुळे स्वरयंत्रावर ताण येतो.
* गळ्यावर बाहेरून झालेले आघात उदा. दोरीने गळा आवळल्यावर किंवा तत्सम प्रकारच्या दाबामुळे स्वरयंत्रात रक्तस्त्राव झाल्यास आवाज बिघडतो.
* काही जिवाणू- विषाणूमुळे होणार्‍या (इन्फेक्शन) संसर्गामुळे घसा बसतो.
* अति बोलणार्‍या किंवा गाणार्‍या व्यक्तींच्या घशात एका विशिष्ट प्रकारची गाठ येऊन घसा बसू शकतो.
* अ‍ॅलर्जीमुळे घशाला सूज येऊनही बोलता येत नाही.
* स्वरयंत्राची हालचाल नियंत्रित करणारी नस निकामी झाल्यामुळे कायमचा आवाज बसतो.

घशाचा कॅन्सर हे देखील घसा बसण्याचे महत्वाचे कारण आहे.
* थॉयरॉईड विकार, काही विशिष्ट (हृदयाचे व मूत्रपिंडाचे) विकार यामुळेही आवाज बदलतो.
* मधुमेह, शेंदूर प्रयोगामुळे (लेड पॉइझन) नस निकामी होते.
*मानसिक तणावामुळेही कित्येकदा विशेषतः स्त्रियांमध्ये घसा बसण्याचे प्रमाण वाढलेले दिसून येते.

उपचार- कारणपरत्वे उपचार झाले पाहिजेत. त्याकरिता योग्य त्या तपासणी करून व्यवस्थित निदान झाल्यास उपचार सोपे होतात.
आवाजाला विश्रांती द्यावी. आवाजाचा उपयोग व दुरूपयोग दोन्ही टाळावेत. घशावर ताण येईल अशा पध्दतीने न बोलता हळू बोलावे तेही आवश्यक असल्यास कुजबुजल्यासारखे बोलण्याने स्वरतारांवर जास्त ताण येतो. हे लक्षात ठेवावे.

 belgaum

गरम पाण्याची वाफ तोंडाने व नाकाने घेतल्याने घशातील ताण बर्‍यापैकी कमी होतो.

होमिओपॅथिक उपचार- होमिओपॅथिव्दारे साध्या घसा बसण्यापासून ते नस निकामी होण्यापर्यंतच्या सर्व व्याधींवर उपचार शक्य आहेत. अतिप्रमाणात आवाज वापरल्यावर घसा बसल्यास ’अर्निका’ हे औषध गुणकारी आहे. गायकांमध्ये घसा बसल्यावर उपयुक्त ठरणारे हे खास औषध आहे. हे औषध गाण्याच्या कार्यक्रमाआधी घेतल्याने आवाज छान मोकळा होतो. वारंवार घसा बसणे, थंडीमुळे घसा बसणे, ओरडल्यामुळे घसा बसणे, अशा एक ना अनेक लक्षणांसाठी अगणित औषधे आहेत. रूग्णांनी फक्त ही औषधे वाचून स्वतःच उपचार घेतल्यास ते पुस्तक वाचून पोहायला शिकण्यासारखे ठरेल. त्याकरिता तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय औषधोपचार घेऊ नये.

डॉ सोनाली सरनोबत
केदार क्लिनिक 08312431362
सरनोबत क्लिनिक 08312431364

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.