Friday, March 29, 2024

/

कर्नाटकी अधिवेशना विरोधात समितीचा मेळावा-मध्यवर्ती बैठकीत निर्णय

 belgaum

13 नोव्हेंम्बर पासून बेळगावात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनास प्रत्युत्तर म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीने मेळावा घेण्याचा निर्णय घेतला आहे.मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्या अध्यक्षतेखाली मराठा मंदिरात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
कर्नाटक विधी मंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच हा मेळावा घेण्यात येणार असून यासाठी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेते मंडळींना मेळाव्यासाठी आमंत्रण देण्याचं देखील ठरवण्यात आलं आहे. आगामी 1 नोव्हेंम्बर हा काळा दिन गांभीर्याने पाळू न मूक सायकल फेरीत हजारोंच्या संख्येनी जनतेने सहभागी व्हावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.मागील आठवड्यात दिल्लीत सुप्रीम कोर्टात झालेल्या कामकाजा बद्दल देखील चर्चा यावेळी करण्यात आली.

Mes 2
गावोगावी जनजागृती
काळा दिन आणि कानडी अधिवेशनाच्या विरोधात आयोजित केलेल्या समितीच्या मेळाव्यात शहरात गावोगावी जनजागृती बैठका आयोजित करण्यात येणार आहेत.
सोशल मीडियाची दखल
काळ्या दिनाच्या सायकल फेरीत हजारोंच्या संख्येने युवक सहभागी व्हावेत यासाठी युवकांनी सोशल मीडियावर जनजागृती करावी असं आवाहन देखील मध्यवर्ती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.इतर राष्ट्रीय पक्षा प्रमाणे समितीच्या नेत्यांनी देखील सोशल मीडियाची दखल घ्यायला सुरुवात केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.