Friday, May 3, 2024

/

वंटमुरी घाटात ट्रक दुचाकी अपघातात  एम बी बी एस विध्यार्थी ठार

 belgaum

ट्रकने मागून दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी चार च्या सुमारास वंटमुरी घाटात सुटकट्टी क्रॉस जवळ घडली आहे.
सुमित रॉय असेअपघातात ठार झालेल्या दुचाकी स्वार युवकाच नाव असून गाडीवर मागे बसलेली त्याची मैत्रीण नेहा ही जखमी झाली आहे.ट्रक ने पाठीमागून जोराची धडक दिल्याने  सुमित हा दुचाकी स्वार घटनास्थळीच ठार तर मागे बसलेल्या नेहा च्या डोक्याला दुखापत झाली आहे नेहा वर बेळगावातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार मयत सुमित आणि त्याची मैत्रीण नेहा हे दोघे जण कोल्हापूर येथून  काही कामा निमित्य बेळगाव ला आला होते कोल्हापूरला परततेवेळी  हा अपघात झाला आहे. दोघेही कोल्हापुर येथे एम बी बी एस शिकत असल्याची माहिती मिळाली आहे.यमकनमर्डी पोलिसात अपघाताची नोंद झाली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.