येथील जीएसएस कॉलेजात शिकणारी आणि २५ कर्नाटक एनसीसी मध्ये नेमबाजीत निपुण झालेली ज्योती बागेकेरी जी व्ही मालवणकर नेमबाजी चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदकाची मानकरी ठरली आहे.
हे सुवर्ण जिंकायचेच हे उद्दिष्ट आपण ठेवले होते. बटालियन मधून सर्व करत करत एक एक निवड चाचणीचा टप्पा मी पार करत गेले. या साठी पत्र होताना आठ शिबिरे पार पडावी लागली आणि २६ सप्टेंबर ला शेवटच्या टप्प्यावर पोचले असे तिने बेळगाव live सांगितले.
जी व्ही मालवणकर चॅम्पियनशीप मुंबईला होती. या स्पर्धेत तिने १०० टक्के यश मिळवले आणि सुवर्ण पदक पटकावले आहे.
वडील अण्णा बागेकेरी आणि आई प्राजक्ता, बटालियन चे गुंडू सर, सुभेदार मेजर सर, बिरसिंग सर, कमांडींग ऑफिसर रॉबिन चेत्री सर , जीएसएस कॉलेजच्या एएनएम वैशाली भारती मॅडम आणि पाप्पांना सर यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले असे ती सांगते.