Wednesday, May 8, 2024

/

उड्डाण पुलाबाबत गृह मंत्र्यांकडे तक्रार

 belgaum

RAmling reddyरेल्वे उड्डाण पुलाच काम लोकांना विश्वासात घेऊन सुरू करावे जून्या पी बी रोड चे उड्डाणपुलाच काम पूर्ण झाल्यावरच नवीन रेल्वे उड्डाण पुलाच काम सुरू करा या शिवाय या भागातील शालेय विध्यार्थी आणि सामान्य माणसांना त्रास होईल असे काम करू नये अशी मागणी गृहमंत्री रामलिंग रेड्डी यांच्या कडे करण्यात आली आहे.

शनिवारी गृह मंत्रीबेळगाव दौऱ्यावर आले असता विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन उड्डाण पुला सदर्भात निवेदन दिले.यावेळी गृह मंत्र्यांनी पोलिस आयुक्तांना उड्डाण पुला बाबत सामान्य जनतेला वेठीस धरू नका यावर तोडगा काढा अश्या सूचना दिल्या.यावेळी पोलीस आयुक्त कृष्ण भट्ट यांनी लवकर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचे सांगितले.

यावेळी सुजित मुळंगुंद यांनी उत्तर भागात दुर्घटना घडली तर अग्निशामक दल आणि इमर्जन्सी एमबुलन्स सेवा पुरवताना ट्रॅफिक जॅम मुळे जीवित हानी झाल्यास खासदार की जिल्हा प्रशासन जबाबदार असा प्रश्न उपस्थित केला.तर कन्नड नेते श्रीनिवास ताळूकर यांनी
खासदार सुरेश अंगडी हे रेल्वे आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना आपल्या घरी बोलावून लवकर काम सुरू करण्यास दबाव आणत आहेत फक्त निवडणुकीत श्रेय लाटण्यासाठी प्रयत्न करत आहेत असा आरोप करत गृह मंत्र्यांकडे तक्रार केली आहे.
यावेळी किरण सायनाक, नेताजी जाधव,रतन मासेकर,मालोजी अष्टेकर रफिक देसाई आदी यावेळी उपस्थित होते.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.