Saturday, April 20, 2024

/

सर्प दंशाने गुंजीतील महिलेचा मृत्यु

 belgaum

आपल्या पतीसोबत शेतात भांगलन करायला गेलेल्या महिलेस सर्प दंश झाल्याने तिचा मृत्यु झाला आहे. कविता पुन्नाप्पा बिरजे वय 40 गुंजी खानापूर अस मयत झालेल्या महिलेचं नाव आहे.

मयत कविता आपल्या पती सह मंगळवारी सायंकाळी शेतात भांगलन करायला गेली असता तिच्या हाताला सर्प दंश झाला होता लागलीच पुन्नाप्पा यांनी उपचारासाठी खानापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले अधिक अत्यवस्थ झाल्यावर बेळगाव सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं मात्र उपचाराचा काहीही उपयोग न होता त्यांचा मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.