Tuesday, April 16, 2024

/

संगीत भजन स्पर्धेत गोव्याच भजनी मंडळ प्रथम

 belgaum

Bhajanबेळगाव मराठी लोक कला संस्कृतीच जतन व्हावं प्रोत्साहन मिळावे यासाठी गेली तीन वर्षे सार्वजनिक वाचनालय भजन स्पर्धांचे आयोजन करत असून बेळगाव गोवा आणि महाराष्ट्रातील उत्कृष्ट भजनी मंडळ सहभागी झाली आहेत अशी माहिती सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष नेताजी जाधव यांनी व्यक्त केले आहे.

सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या संगीत भजन स्पर्धेत हॅपी स्पोर्ट्स क्लब भजनी मंडळ गवळेभाट चिंबळ गोवा या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. या संघास 15 हजार रोख रक्कम वितरित करण्यात आली.
,सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने स्पर्धे नंतर बक्षीस वितरित करण्यात आले. दुसरा क्रमांक श्री नाद ब्रह्म भजनी मंडळ कसाल, दुसरा रवळनाथ भजनी मंडळ कडलगे, तिसरा सतेरीदेवी भजनी मंडळ बेटगेरी,तिसरा पंचराशी भजनी मंडळ राकसकोप, चौथा साई भजनी मंडळ सुभाष चंद्र नगर बेळगाव चौथा संत सखुबाई भजनी मंडळ मौजे कारवे, पाचवा संत तुकाराम भजनी मंडळ मौजे कारवे, उत्तेजनार्थ यलेश्वर भजनी मंडळ हंदिगनुर,विठ्ठल रुखमाई भजनी मंडळ कुद्रेमनी, उत्कृष्ट तबला वादक मुक्ताई भजनी मंडळ कंग्राळी खुर्द,उत्कृष्ट मृदंग वादक हॅपी स्पोर्ट्स क्लब भजनी मंडळ गोवा,उत्कृष्ट पेटी वादक विठ्ठल रुखमाई भजनी मंडळ करले, उत्कृष्ट गायक रवळनाथ भजनी मंडळ कडलगे या पुरस्कार रोख रक्कम वितरित करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.