Tuesday, April 16, 2024

/

जिल्हाधिकाऱ्यांनी जपला धार्मिक सलोखा

 belgaum

मुस्लिम पोलीस निरीक्षकां पाठोपाठ जिल्हाधिकारी एस जिया उल्ला यांनी देखील गणेश उत्सवात महा आरतीत सहभागी होऊन धार्मिक सलोख्याचे वातावरण निर्माण करण्यास मदत केली आहे.

Dc
बुधवारी रात्री जिल्हाधिकारी एस जिया उल्ला हे एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल सात गणेश मंडळांच्या महाआरतीत सहभागी झाले होते. महामंडळाचे जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी यावेळी उपस्थित होते .फेटा परिधान करून कपाळावर कुंमकूम टिळा लावत प्रत्येक मंडळाच्या महा आरतीत हातात आरती घेत एकात्मतेचा सन्देश देत होते. तहसीलदार गल्लीतील अन्नछत्र महाप्रसादाचे वितरण सुरुवात देखील त्यानीच केली.

झेंडा चौक,नरगुंदकर भावे चौक,हुतात्मा चौक,भांदुर गल्ली आणि तहसीलदार गल्ली येथील महा आरतीत सहभाग घेतला होता प्रत्येक मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार केला. बेळगावातील सार्वजनिक गणेश  उत्सवात सर्वांचा सहभाग पाहून आनंद व्यक्त करत मंगळवारी होणारी विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडा अस भावनिक आवाहन ते कळकळीने प्रत्येक मंडळा समोर करत होते.Dc jiaअन्य धर्मीय असून देखील इतक्या सगळ्या मंडळांच्या आरतीत सहभागी होणे सगळ्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत शांततेच आवाहन करणं म्हणजे भविष्यात लोकप्रिय जिल्हाधिकारी बनण्याची लक्षण आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.