Monday, April 29, 2024

/

ताठा(EGO)-वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स

 belgaum

DR sonali

काही लोक अतिशय गर्विष्ठ असतात.मनामध्ये अहंभाव पुरेपूर भरलेला असतो.आपल्या सारखे दुसरे कोणी नाही अशी यांची समजूत असते.वस्तुतः हे लोक फारच हुशार असतात.सर्वगुण सम्पन्न असतात ही. त्यामुळे ते कोणाच्यात ही मिसळत नाहीत. आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत,श्रेष्ठ आहोत अशी त्यांची समजूत असल्यामुळे त्यांनी कोणाशीही नाते जोडता येत नाही. या व्यक्ती आपले मन कोणाकडे हि मोकळे करत नाहीत. तसे करण्यामद्ये त्यांना कमीपणा वाटतो.त्यामुळे अशा व्यक्ती कितीही त्रास झाला तरी कोणाला काही सांगत नाहीत. दुसऱ्याचा पाणउतारा करणे,तुसडेपणा,कुजके बोलणे यातच त्यांना धन्यता वाटते.आशा व्यक्तीच्या तोंडून दुसऱ्याची स्तुती कधीच ऐकायला मिळत नाही.
अशाच एका आईला आपल्या मुली बद्दल प्रश्न पडला होता.ती मुलगी दिसायला खूप सुंदर होती. फर्स्ट क्लास फर्स्ट येऊन कॉम्पुटर इंजिनिर झाली होती. देवाने सुंदर गाता गळा दिला होता. घरची परीस्थिती अगदी चांगली होती. या मुलीने आता पर्यंत फक्त यशाची धुंदी अनुभवली होती. अभ्यासात ,गाण्यात,सौंदर्यात, पैशात कशाचीच कमतरता नव्हती. बाईसाहेबांचे पाय जमिनीवर पडतच नसंत.
स्थळ शोधण्याची वेळ आल्यावर तिला एकही मुलगा पसन्त पडेना.प्रेम जमण्याची गोष्टच दूर कारण स्वतःपुढे जाऊन तिने कुणाचाच विचार केला नव्हता.एका भयंकर इगोने ये मुलीला घेरले होते. आईला तिच्या भविष्याची काळजी होती.सांगून सावरून समजुतीने मुलगी बधत नाही म्हटल्यावर त्यांनी पुष्पऔषधी मदत घ्यायची ठरवली.
या मुलीची सारखी मान दुखायची. त्याचे निमित्त करून पुष्पऔषधी दिल्यावर सुमारे आठ दहा महिन्यानी तिच्यात बराच फरक दिसू लागला. फक्त आकाशात फिरणाऱ्या विमानाचे पाय जमिनीवर दिसू लागले. असे बरेच लोक आपण आस पास पाहत असतो. मनात त्यांच्या स्वभावा बद्दल नाक मुरडून ही गप्प बसते.पण त्या व्यक्तीच्या नॉर्मल कुटुंबियांचे मात्र हालच असतात. तर संगायचा उद्धेश असा कि अशा पराकोटीच्या स्वभावाला ही औषध असते.

अशा अहंवृत्तीच्या अनेक व्यक्ती असतात. विशेषतः वयात येणाऱया मुलामुलींमध्ये अशा वृत्तीच्या छटा उमटू लागतात. हि वृत्ती चिपळण्यासाठी पुष्पऔषधी सुरु केल्यास अशा स्वभावामुळे होणारे नुकसान टाळता येते. अशा व्यक्ती अनेकदा उचकस्तरीय ठिकाणी असतात. उदा जिल्हाधिकारी पोलीस प्रमुख राजकीय नेते, अध्यात्मिक अधिकारी व्यक्ती,अभिनेते, वरिष्ठ पदाधिकारी इ.इ. हि यादी खूप मोठी आहे.अशा जाबादरीच्या किंवा प्रसिद्दीच्या ठिकाणी असल्यामुळे एक प्रकारचा अलिप्तपणा त्यांच्या वागण्याला देतो. आपोआप त्यांचा जनसामान्यांनशी संपर्क कमी होतो आणि ते वेगळ्याच स्तरावर आपले जीवन जगू लागतात. असे लोक मग आपल्या भोवती एक कोष निर्माण करतात.काहींना हा अजिबात फोडता येत नाही. उच पदावर असलेल्या लोकांनी निवृत्त झाल्यावर सर्वसंन्यानावर जीवन जगताना फारच क्लेशमय वाटू लागते. अशा लोकांनादेखील आपल्या चाकोरीतून बाहेर पडण्यासाठी पुष्पऔषधी उपयुक्त ठरतात.
अति अहंभाव असणाऱ्या व्यक्तींना शारीरिक स्तराववर त्वचेचे विकार होतात. विशेषतः त्यांच्या हाताला हे विकार होतात. पुष्पऔषधी संशोधकांच्या मते हातानेच इतरांशी सम्पर्क येत असतो. आणि बोलण्यामुळे,हातावर त्वचा रोग उदभवणे…

 belgaum

डाॅ.सोनाली सरनोबत

केदार क्लिनिक ०८३१-२४३१३६२
सरनोबत क्लिनिक ०८३१-२४३१३६४

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.