Thursday, May 2, 2024

/

समितीचेच आमदार खरे!

 belgaum

पदाचा गैरवापर करणे हा बेळगावातल्या राष्ट्रीय पक्षातील आमदारांचा जणू काही धंदाच बनला आहे.आपल्या संस्थेला हवी म्हणून कोणी सुपीक जमिन बळकावण्याचा प्रयत्न करतो…कोणी भर रस्त्यावरच अतिक्रमण करून शिक्षण संस्थेचे शेड उभारतो तर कुणी राष्ट्रीय सुरक्षेशी संबधित     वादग्रस्त जागेत शिक्षण संस्था थाटतो, आता नुकताच उघडकीस आलेलं उदाहरण आहे सरकारी नाला वळवून अपार्टमेंट बांधण्याचं, यावरून बेळगावचे लोकप्रतिनिधी सत्ता आल्यावर किती माजतात हे दिसून येते….मात्र या सगळ्याला समितीचे आमदार अपवाद आहेत, म्हणूनच फक्त मराठीच नव्हे तर कानडी भाषिकही स्पष्टपणे म्हणतात समितीचेच आमदार बरे आणि खरे.

 

बळवंतराव सायनाक, बापूसाहेब महागावकर, प्रभाकर पावशे,नारायणराव तरळे, बी आय पाटील अशा जुन्या आमदारांपासून आतापर्यंतच्या आमदारांपर्यंत सार्याचाच जनतेला आधार होता. जनतेसाठी लढ्यात पुढे असणारे आमदार म्हणून त्यांची ओळख होती आणि आजपण शिल्लक आहे.हे कधी पैशांच्या मोहपोटी जनतेच्या टाळूवरचे लोणी खात नव्हते, की जनतेला धमकावून त्यांनी कधी आपली पोळी भाजली नाही. सध्याच्या काळात एखाद्या आमदारावर असा आरोप झालेला आठवतो, तांदळात एक दोन खडे असतीलही पण असे मोठे लुबाडणुकीचे प्रकरण करून एखाद्याला रस्त्यावर आणण्याचे प्रकार समितीच्या आमदारांनी केले नाहीत.

 belgaum

Mes logoआमदार म्हणजे जनतेचे सेवक आणि रक्षक असावेत ही भावना राष्ट्रीय पक्षाच्या मंडळींनी धुळीला मिळवली आहे.ते भक्षक झालेत आणि त्यांना भसम्या रोगही झाला आहे.यात अपवाद ठरेल असा कोण दिसत नाही. बंदूक, पोलीस आणि गुंडांच्या जीवावर त्यांचे धंदे जोरात सुरू झालेत.त्यांना लाज लज्जा अब्रू शरम नाही. प्रकरण बाहेर पडले तर ते हसतात, माजी अब्रू काडशील तर तुजी काढेन अशी धमकी देऊन मोकळे होतात. प्रसंगी एक मेकांना वाचवायला पक्षभेद विसरून एक होतात. यामुळे त्यांना कसलीच भीती राहिलेली नाही, हे चित्र घातक आहे.

बेळगाव जिल्ल्यावर सध्या माफिया लोकप्रतिनिधींचे राज्य सुरू आहे. वाळू, तेल ,दारू,जमीन,मटका आणि चामड्याचे माफिया पदांवर आहेत. पोलीस त्यांना टरकून असतात. राष्ट्रीय पक्षांची धोरणेही ते पायदळी तुडवत पुढे जातात.त्यांच्याकडे इतका पैसे आला कसा आणि कुठून हे समजणे कठीण आहे. जे काही कमावले आहे ते सामान्यांची मान पिरगळुन हे नक्की आहे.

समितीच्या आमदारांनी विकास केला नाही हे खरे असेल मात्र कुणाची घरे मोडली नाहीत. कुणाची शेती किंवा जागा हिसकवली नाही.कोटींचा हिशोबात विकास निधी अलीकडे उपलब्ध होऊ लागला आहे पूर्वी आताच्या तुलनेत निधी कमीच मिळायचा. समिती आमदारांना त्यांच्या मतदारसंघात कुणीही त्यांना आपल्या घरी किंवा शेतावर बिनधास्त बोलवू शकत होते, आजही शकतात, आणि त्यांच्यात नैतिकता होती व आहे. ती राष्ट्रीय पक्षात दिसत नाही. त्यांची नैतिक पातळी खालावलेली आहे.याची कारणंही अनेक आहेत. विकासाच्या नावाखाली जनतेला भुलवून पैसे पेरून ते आज भस्मासुर होऊन बसलेत आणि त्याच मतदान केलेल्या जनतेला खाऊ लागले आहेत.

विधानसभा तोंडावर आहे, तेंव्हा आता मतदान करणारे शहाणे होतील अशी इच्छा आहे. ,बेळगाव live ने घेतलेल्या आढाव्यात यावेळी बरेचजण राष्ट्रीय पक्षांच्या प्रवाहातून पदांसाठी समितीच्या वाटेवर येण्याच्या तयारीत आहेत. समितीच्या प्रवाहात निष्ट जपणार्याना ही गोष्ट पटणार नाही. नेत्यांनू जर सावध होऊन विचार करा नाहीतर हातावर हात धरून पडून ऱ्हावा. बेळगाव live ने विचारलेल्या प्रसन्न उत्तर देताना अनेकजण हीच भावना व्यक्त करतायेत.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.