Friday, April 19, 2024

/

बेळगावच्या पत्रकारांचे करोशी मामा रिटायर्ड.. 

 belgaum

बेळगावच्या सर्व पत्रकारांना माहिती खात्यात गेले की  सर्व लाड पुरवणे , कार्यक्रमांची पत्रकार परिषदांची  चटकन माहिती देणे  असली सगळी वार्ता भवनातातील  कामे निभावून नेणारे कल्लाप्पा करोशी आज  सेवा निवृत्त झालेत . गेली ३४ वर्ष त्यांनी माहिती आणि प्रसारण खात्यात म्हणजेच  वार्ता भवनात शिपाई या पदावर काम केलय.

आताच्या  नव्या दमातील युवा पत्रकारासह अनेक दिग्गज अश्या जेष्ठ आणि मध्यम पत्रकारांना देखील करोशी यांनी चांगल्या पद्धतीने हाताळलं आहे त्यामुळे  सर्वाना  ते परिचित , आमच्या सारख्या युवा पत्रकाराना ते करोशी मामा तर सिनियर पत्रकारांना  करोशी म्हणून परिचित  होते .

karoshi

 belgaum

जानेवारी १९८३ साली  शिपाई म्हणून सेवेत  रुजू झालेले  करोशी आज तब्बल ३४ वर्षाच्या  एकाच कार्यालयातील प्रदीर्घ सेवे नंतर  निवृत्त झाले आहे .बुधवारी सायंकाळी माहिती कार्यालयात  जिल्हा माहिती अधिकारी गुरुनाथ कडबूर यांनी  सेवा निवृत्ती निमित्य त्यांचा  सत्कार केला या निमित्य अनेक पत्रकार आणि माहिती खात्यातील कर्मचारी हजर होते या कार्यक्रमात करोशी रिटायर होणार म्हंटल्याने अनेक पत्रकार आणि कर्मचाऱ्यांच्या  डोळ्यात पाणी आलं होत .  १९८३ ते जवळपास २००० पर्यंत सायक्लो स्टॅन्ड मशीन वर स्वतः प्रिंट काढून ते सरकारी आणि इतर महत्वाच्या बातम्या प्रेस नोट सगळया दैनिकांना  शहरात फिरून वाटत होते त्यांनतर इंटरनेट च्या युगात काही दिवस प्रिंट देखील वाटप केलं अलीकडे मेल सेवेमुळे त्यांची दैनिकांना प्रेस नोट सेवा केवळ  महत्वाच्या प्रेस पुरतीच नोट मर्यादित होती सगळया पत्रकारांसाठी  सेवा बजावणाऱ्या या अवलियास बेळगाव live कडून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा …

खरोशी मामा .. मोबाईल ०९४४९७३५७८५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.