Friday, May 24, 2024

/

काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष

 belgaum

Victory congressमैसूर जिल्ह्यातील नंजनगुड आणि गुंडलूपेठे या दोन विधान सभा पोट निवडणुकीत विजय मिळविल्या नंतर बेळगाव काँग्रेस च्या समर्थकांनी विजयोत्सव साजरा केलाय.
प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या नेतृत्वात चनम्मा चौकात फटाक्यांची आतषबाजी करत मिठाई वितरित करत जल्लोष व्यक्त केला.
राज्यातील जनतेचा कल काँग्रेस कडेच असून या पोट निडणुकीतील विजयामुळे हे सिद्ध झालं आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या लोकोपयोगी योजनांचा फायदा पक्षाला झाला आहे ही निवडणूक आगामी विधान सभेची रंगीत तालीम होती त्यामुळं पुढील निवडणुकात काँग्रेस अव्वल राहील बहुमत मिळविल असा विश्वास प्रदेश काँग्रेस अध्यक्षा लक्ष्मी हेबबाळकर यांनी दिली आहे.

यावेळी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विनय नावलगट्टी, युवराज कदम, मोहन रेड्डी,चननराज हट्टी होळी आदी उपस्थित होते

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.