महापालिकेने केलेली अवाढव्य घरपट्टी रद्द करा अन्यथा शिवसेना स्टाईल ने आंदोलन केलं जाइल असा इशारा शिवसेनेनं दिला आहे
बेळगाव शिव सेनेच्या वतीनं महापौर उपमहापौरांना निवेदन देण्यात आलं .गुरुवारी शिव सेना जिल्हाध्यक्ष प्रकाश शिरोळकर यांच्या नेतृत्वात सैनिकांनी महापौर संज्योत बांदेकर यांना निवेदन सादर केलं
पालिकेने वाढीव केलेली घर पट्टी अन्यायकारक असून गरिबांना न परवडणारी आहे त्यामुळं वाढीव घरपट्टी रद्द करावी यासह शहरातील गटारी दुरुस्तीसह पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे
यावेळी शिव सेना उपजिल्हा प्रमुख बंडू केरवाडकर यांच्यासह शहर प्रमुख दिलीप बैलूरकर,तालुका प्रमुख सचिन गोरले आदी उपस्थित होते