सध्या बेळगाव शहर परीसरात यात्रांचे हंगाम सुरू आहे अनेक गावांत देव देवतांची यात्रा सुरू आहेत होत आहेत या जत्रातून मंदिरासमोर आगीच्या इंगळातून पळत जाण्याची परंपरा असते त्याला इंगळ्या नहाणे म्हणतात. इंगळ्या नाहते वेळी अनेक अपघात घडत असतात म्हणून बेळगाव live म्हणत आहे इंगळ्या नाहतेवेळी सावधान !
इंगळ्या मध्ये पडून भाजल्याने एक 17 वर्षीय बालक जखमी झाल्याची घटना बेळगाव तालुक्यातील चंदनहोसुर गावातील कलमेश्वर यात्रेत घडली आहे.
यात्रे दरम्यान इंगळ्यातून पळतेवेळी इंगळात पडल्याने ही घटना घडली आहे चंद्रशेखर अस या जखमीचं नाव असून जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल मध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत . त्याचा पाय आणि हात आगीत भाजल्याने गंभीर इजा पोचली आहे. हिरेबागेवाडी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे