बेळगाव दि 26- माजी मुख्यमंत्री एस एम कृष्णा यांनी काँग्रेस पक्षात राहून सत्तेचा स्वाद घेतला आहे . जावई सिद्धार्थ यांची कॉफ़ी डे अतिक्रमित केलेली संपत्ती वाचवण्यासाठी भाजपाचा रस्ता धरला आहे असा गंभीर आरोप के पी सी सी माजी सदस्य शंकर मुनवळळी यांनी केला आहे. बेळगाव मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते .
काँग्रेस पक्षातील एक शिस्तीचा शिपाई म्हणुन कृष्णा यांना या आधी ओळखत होतो मात्र पक्षात सत्तेचा वापर करून खाल्या घराचे वाशे मोजल्या सारखं आहे ज्या पक्षानं दर्जा किंमत दिली त्या पक्षाशी त्यानी गद्दारी केली आहे असेही मुनवळळी म्हणाले.
काँग्रेस पक्षाला पदासाठी वापरून सोडणाऱ्या कृष्णा यांच्या बद्दल भाजप कार्यकर्त्यांनी विचार करायची गरज असून भाजपात घेतेवेळी आर एस एस ने विरोध करायला हवा होता जस काँग्रेस ला जसा धोका कृष्णा यांनी दिलाय तसाच धोका एक दिवस भाजपा ला देतील असं भाकीत देखील मुनवळळी यांनी काढला आहे.