Thursday, May 23, 2024

/

अमित त्रिवेदीच्या लाइव्ह इन कन्सर्टची रसिकांवर मोहिनी

 belgaum

Git amit trivediबेळगाव,दि.२६-उडता पंजाब,क्वीन आदी चित्रपटातील गाण्याने तरुण पिढीच्या गळ्यातील ताईत बनलेल्या गायक अमित त्रिवेदी लाइव्ह कन्सर्टला तरुणाई बरोबरच इतरांचाही उस्फुर्त प्रतिसाद लाभला.अमित त्रिवेदी आणि सह गायकांनी गायलेली गाणी ,वाद्यवृंदाची लाभलेली समर्थ साथ यामुळे उपस्थित रसिकांची पावले थिरकली.गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजितर्फे आयोजित करण्यात आलेल्या औरा २०१७ या राष्ट्रीय पातळीवरील महोत्सवाची सांगता अमित त्रिवेदी लाइव्ह इन कन्सर्टने झाली.
एकाहून एक सरस गाणी अमित त्रिवेदी,जोनिका गांधी,दिव्याकुमार आणि अरुण कामत यांनी गाणी सादर करून उपस्थितांची मने जिंकली.उपस्थितांची फर्माईश देखील अमित आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पूर्ण केली.स्वर आणि सूर यांची अनोखी अनुभूती उपस्थितांनी अनुभवली.
प्रारंभापासूनच रसिकांच्या मनावर अमित आणि सहकाऱ्यांनी ताबा मिळवून त्यांना आपल्या स्वरात चिंब केले. उपस्थितांना त्यांच्या मोबाईलचे लाईट ऑन करायला सांगून एक वेगळाच नजारा उपस्थितांना अनुभवायला लावला.स्टेज वरून खाली बसून तरुणाईशी संवाद साधून त्यांची मने जिंकली.शिवाय आपल्या समवेत त्यांनाही गायला लावून कन्सर्टमध्ये त्यांनाही सहभागी करून घेतले. नेत्रदीपक प्रकाश योजना देखील कन्सर्टचे आकर्षण ठरली होती.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.