बेळगाव दि 26-अभिनेते सयाजी शिंदे बेळगावातील शेतकऱ्यांच्या समस्ये विरुद्ध आवाज उठवणार आहेत.दुष्काळग्रस्त शेतकरी आणि आत्महत्त्या वर आधारीत आगामी मे महिन्यात अभिनेते सयाजी शिंदे यांचा धोंडी हा सिनेमा महाराष्ट्रासोबत बेळगाव मध्ये प्रदर्शित होणार आहे.या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी सयाजी शिंदे बेळगाव ला येणार असून शेतकऱ्यांच्या समस्यांची जनजागृती करणार आहेत .शेतकऱ्यांच्या मेळाव्यात देखील ते सहभागी होऊन जागृती करणार आहेत.
धोंडी सिनेमाचे दिग्दर्शक आणि निर्माते मोनिष पवार यांनी आज बेळगावला भेट दिली होती .प्रकाश आणि ग्लोब सिनेमा चे संचालक महेश कुगजी यांची मोनिष पवार यांनी भेट घेतली. सोईल ग्रुप ऑफ कंपनीच्या कार्यालयात बैठकीच आयोजन करण्यात आलं होतं. बैठकीत थाटात धोंडी सिनेमा च स्वागत करण्याचं ठरविण्यात आलं. सोईल ग्रुप चे संयोजक नेमण्यात आले.बेळगावातील अनेक शेतकरी संघटनांना संपर्क साधून सयाजी शिंदे यांना बेळगाव ला पाचारण करण्याचे ठरविण्यात आले . यावेळी सुनील जाधव, लक्ष्मण यादव, पिराजी वेताळ, महेश भोसले, धीरज सूर्यवंशी, निलेश पाटील, संतोष पाटील, संभाजी सुतार, प्रवीण तवकारी,रामदास कलखाम्बकर आदी उपस्थित होते.
