बेळगाव दि ६ :बेळगाव सीमा लढ्याचं अस्मितेचं केंद्र बिंदू असणार येळ्ळूर मधील मराठी भाषिकांनी १७ फेब्रुवारीला होणाऱ्या मराठी क्रांती मोर्चात सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला आहे . कोणतेही आंदोलन असो किंवा लढा असो येळ्ळूर गाव नेहमीच पुढं असते त्यामुळे मराठी मोर्चात देखील येळ्ळूर गावाचा सिंहाचा वाटा असणार हे मराठा मोर्चा रविवारी सायंकाळी आयोजित बैठकीत सर्वानुमते ठरविण्यात आलं.
गेली ६० वर्ष आंदोलन आणि लढवय्या बाण्याची धार धग आजही कायम आहे त्यामुळे मराठा मोर्चात देखील येळ्ळूर गावची भूमिका निर्णायक असेल असं मत येळ्ळूर एकीकरण समितीचे नेते अर्जुन गोरल यांनी व्यक्त केलं चांगळेश्वरी मंदिरात आयोजित सकाळ मराठा समाजाच्या मोर्चा बैठकीत ते बोलत होते .
यावेळी दत्ता उघाडे , दुधाप्पा बागेवाडी , वामन राव पाटील , रावजी पाटील , शांताराम कुगजी , मारुती कुगजी , राजू पावले , सर्व ग्राम पंचायत सदस्य , ए पी एम सी सदस्य महेश जुवेकर , एक हजार हुन अधिक लोक बैठकीस उपस्थित होते .
Trending Now