बेळगाव दि १५ :मूक मोर्चात परिधान करण्यासाठी टी शर्ट झेंडे आणि टोप्या सह इतर साहित्य खरेदी साठी शेवटच्या दिवशी झुंबड उडाली . शहरातील रामलिंग खिंड गल्लीतील सकल मराठा समाजाच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर दिवसभर प्रचंड गर्दी झाली होती . हजारोच्या संख्येने युवक युवती मोर्चा परीधार करणारे साहित्य खरेदी करताना दिसत होते .
मध्यवर्ती कार्यालय बाहेर मंडपात दोन तर मंडपां बाहेर २ स्टाल वर तोबा गर्दी झाली होती . टी शर्ट खरेदी करण्यात युवक आणि युवतींची गर्दी अधिक होती यामध्ये शिवाय शिवाजी महाराजांचे पोस्टर मराठा समाजाचे लोगो एक मराठा लाख मराठी पोस्टर खरेदी करण्यात येत आहे . शहरातील एस पी एम रोड ,आर पी डी क्रॉस ,यासह सुळगा हिंडलगा अनेक स्टोल येथे टी शर्ट विक्री जोरात सुरु आहे .
क्रांती मोर्चा सामान विक्रेत्याने दिलेल्या माहिती नुसार बेळगावात टी शर्ट आणि इतर सामान हजारोंच्या संख्येने विकल गेल आहे आजच्या शेवटच्या दिवशी हजारो स्टोक आम्ही आणला होता तो सगळा विक्री केला गेला आहे . सगळय न हे सामान मिळाव या साठी अनेक ठिकाणी स्टोल उभारण्यात आलेत . एकूण चार ते पाच जण शहरात याची विक्री करताहेत .