Friday, April 19, 2024

/

बेळगाव मराठी मोर्चात कोण घालतंय आडवा पाय ? काय आहे सीमा वासीय मराठी माणसाची जबाबदारी जरूर वाचा बेळगाव लाईव्ह चा विशेष संपादकीय“मराठा क्रांति समोर विघ्न नको”

 belgaum

मराठे युद्धात जिंकतात आणि तहात हरतात हे दूषण आम्ही आणखी किती वर्षे मिरवणार आहोत? शिवरायांची जयंती आम्ही दोनदा साजरी करतो. एकमेकांचे पाय ओढतो आणि आम्हाला खेकडा मानून घेण्यात अभिमान वाटतो? मराठा क्रांतीत १९ फेब्रुवारी चे जे राजकारण सुरु आहे, ते काय भूषणावह आहे?

कट्टर आणि जातिवंत मराठा मानून घेणाऱ्या प्रत्येकाला हे प्रश्न आज पडायलाच हवेत. आणि पडत नसतील तर तो जातीचा आणि मातीचा अपमानच आहे. सीमाभागात राष्ट्रीय पक्षांची गणिते आखण्यासाठी जातीचे राजकारण करू पाहणाऱ्या जातबांधवांनी याचा विचार करायला नको?

सीमाप्रश्न हा श्वास मानून मराठी मोर्चाची क्रांती हेच बेळगावातल्या मराठा आणि मराठी माणसाचे कर्तव्य आहे. यात आडवा पाय घालणे मराठा आणि मराठी म्हणून जगणाऱ्या कोणासही शोभणारे नाही, याचा विचार करायला नको?

 belgaum

म्हणे लागले आम्हास भाग्य बोलतो मराठी , हे भाग्य किती दिवस असे लाथाडत राहणार आहोत आम्ही? तेही दुसऱ्यांच्या स्वार्थाच्या राजकारणात भरडत? आपल्या मातीशी इमान राखणे ही आपली जबाबदारी नाही का? भलेतरी देऊ कासेची लंगोटी नाथाळ्याचे माथी हाणू काठी या तुकोबांच्या शिकवणुकीचा विसर का म्हणून पडलाय?

विचार करा. चला दाखवून देऊ, मराठे खेकड्याची औलाद नाहीत, मराठे तहातही जिंकतात, आणि एक क्रांतीत विघ्न नको आहे. बस्स बोला छत्रपती शिवाजी महाराज कि जय……!

marathi morcha logo

1 COMMENT

  1. बेळगावमधील जनसामान्य मराठा-मराठी जनतेने ज्यांना आपले म्हणून मोठ केल तेच जर आपल्या अहंकार,प्रतिष्ठेसाठी क्रांती मोर्चात खो घालत असतील तर बेळगावात जन्मा येऊन वायाच.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.