Thursday, May 23, 2024

/

महाराष्ट्रातून सहभागाचा पाठिंबा आवश्यक : सरस्वती पाटील , अनेकांनी उचलल्या मोर्चा सेवा बजावण्याची जबादारी

 belgaum

बेळगाव दि १ :जायंट्स उचलणार साफ सफाईची जबाबदारी :मोर्च्यात झाल्यावर सगळीकडे जमणारा कचरा स्वच्छ करून साफ सफाई करण्याची जबाबदारी घेणार असल्याची घोषणा जायंट्स संघटनेच्या वतीने मदन बामणे यांनी केली . जवळपास १५० हुंक अधिक जायंट्स कार्यकर्ते मोर्च्या संपल्यावर सर्व कचरा संकलन करून स्वच्छता मोहीम हाती घेणार आहेत .

सर्वांच्या टी शर्टवर एकच घोष्य वाक्य असावे : शेतकऱ्यांच्या वतीने मोर्च्यात पाठींबा देण्यास आलेले बेळगाव शेतकरी संघटनेचे  नारायण सावंत यांनी मोर्च्यातील सर्वांच्या टी शर्ट वर एकच घोष्य वाक्य असावे जेणेकरून बेळगावकरांचा जीवन मरणाचा असलेल्या सीमा प्रश्नाला वाचा फुटेल  मी बेळगावचा आणि बेळगाव महाराष्ट्राचा से घोष्य वाक्य करा शी सूचना त्यांनी केली . यावेळी कोणीही अन्य टी शर्ट खरेदी करू नये मध्यवर्ती कार्यालयातून सर्व टी शर्ट एकदाच एकाच घोष्य वाक्य असलेली खरेदी करणार आहेत याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे .

१७ फेब्रुवारी नो वेहिकल डे असावा : महादेव चौगुले :मोर्चा दिवशी बेळगाव महा पालिका कार्यक्षेत्रातील सर्व लोकांनी दुचाकी अथवा कार वापरू नये बेळगाव शहरातील गल्ली जास्त रुंद नसल्याने सर्वांनी त्या दिवशी नो वेहिकल डे पाळावा याशिवाय  भांदूर गल्ली तील २५० गणेश मंडळाचे कार्यकर्ते स्वयंसेवक म्हणून काम करणार असल्याची घोषणा महादेव चौगुले यांनी केली . वडगाव भागातील दत्ता पवार यांनी २०० कार्यकर्ते मिरवणूक मार्गावर असतील आणि स्वयसेवा करतील अशी माहिती दिली .

 belgaum

नारायण संस्था पिण्याचे पाणी देणार : नेताजी जाधव :माजी नगरसेवक नेताजी जाधव यांनी मोर्च्यासाठी ज्या पद्धतीने कोल्हापूर मध्ये मुस्लीम आणि मारवाडी समाजान पाणी आणि जेवणाची सोय केली होती तश्य पद्धतीने इतर समाज मदत करायला इच्छुक आहे त्यांची मदत घेंची सूचना करत नारायण संस्थेच्या वतीने पिण्याचे पाणी देण्याच घोषणा केली . मराठा समाजातील शिंपी लोहार असे लहान समाजाला सामावून घेऊ अशी सूचना विजय होनगेकर यांनी तर मिरवणूक मार्गाची सजावट करण्यासाठी  किशोर मराठे आणि युवकांनी घेतली आहे. अड्वोकेट सुधीर चव्हाण यांनी वाकीलासोबत कायदेशीर बाजू सांभाळू अस आश्वसन दिल .

८६५ खेद्याना संपर्क करा : एस एम बेळवटकर :ऐतिहसिक मराठा आणि मराठी क्रांती मोर्च्यास सीमा भागातील ८६५ गावांना संपर्क साधून जनजागृती करूयात बेळगाव केंद्र बिंदू असला तरी सर्वाना सामावून घेणे सीमा प्रश्नाला पूरक आहे :

maratha belgaum office 2

महाराष्ट्रातून सहभागाचा  पाठींबा आवश्यक : सरस्वती पाटील  :ज्या पद्धतीने आम्ही हजारोंच्या संख्येने कोल्हापूर मोर्चात सामील झालो होतो तश्याच पद्धतीने हजारोच्या संख्येने कोल्हापूर सांगली सातारा कोंकणातून मराठी बांधव सामील करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत अस मत जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांनी मांडले

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.