बेळगाव दि ७ : १६ फेब्रुवारी ला सकल मराठा समाजाच्या वतीने काढण्यात येणाऱ्या मराठा क्रांती मोर्चा पोलीस प्रशासनाने परवानगी दिल्या नंतर आता मोर्चा चा मार्ग कसा असेल याकडे सर्वांच लक्ष लागले आहे कारण मराठी मोर्चा ला वाढता पाठिंबा पाहता लाखो लोकांची उपस्थिती राहणार आहे. यासाठी मोर्चा संयोजक राजेंद्र मुतगेकर यांनी दिलेल्या माहिती नुसार मोर्चाची सुरुवात शिवाजी उद्यानातून होऊन सांगता धर्मवीर संभाजी चौकात होऊ शकते . संयोजकांनी ठरविलेला असा असेल मोर्चा चा मार्ग
शिवाजी उद्यान , कपिलेश्वर रोड , रेल्वे उड्डाण पूल ,शनी मंदिर , हेमू कलानी चौक ,टिळक चौक ,रामलिंग खिंड गल्ली, बसवन गल्ली ,मारुती मंदिर मारुती गल्ली हुतात्मा चौक ,रामदेव गल्ली ,संयुक्त महाराष्ट्र चौक ,समादेवी गल्ली, राजेंद्र प्रसाद चौक ते धर्मवीर संभाजी चौक