बेळगाव दि १५: मार्च महिन्यात मुंबईत जो मराठा समाजाचा मोर्चा निघणार आहे त्यात कर्नाटक प्रशासनाला आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ, जसा महाराष्ट्रात भाजप वर बहिष्कार टाकला कर्नाटकात कॉंग्रेस प्रशासन आहे जर कर्नाटक पोलिसांनी मराठयावर दडपशाही थांबिविली नाही तर उद्या महाराष्ट्रात कॉंग्रेस वर देखील बहिष्कार टाकू अशी भूमिका मराठा महा संघाचे राज्य कार्यकारणी सदस्य वीरेंद्र पवार यांनी दिली आहे .
औरंगाबाद मध्ये झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत या बाबतीत निर्णय घेण्यात आला आहे . या अगोदर आम्ही महाराष्ट्रात भाजपवर बहिष्कार टाकण्याचा ठराव मंजूर झाला आहे . जर का बेळगावातील मराठी जनतेवर अन्याय कमी झाला नाही तर महारष्ट्रातील कॉंग्रेस ला देखील मोठी किंमत मोजावी लागेल अस देखील वीरेंद्र पवार म्हणाले .